Homeताज्या बातम्यागोदावरी वसाहत आणि ३४० गट नंबर मधील जागा रहिवाश्यांच्या नावावर करणार; डॉ...

गोदावरी वसाहत आणि ३४० गट नंबर मधील जागा रहिवाश्यांच्या नावावर करणार; डॉ सुजय दादा विखे पाटील

गोदावरी वसाहत आणि 340 गट नंबर मधील जागा रहिवाश्यांच्या नावावर करणार – डॉ. विखे पाटील

राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे नाव सात बारा उताऱ्यावर येईल. आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळला असल्याचे प्रतिपादन भाजपा चे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. .

राहाता तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे जागेच्या संदर्भात विशेष पाठपुरावा करून तेथील रहिवाश्यांच्या नावावर जागा करण्याबाबत डॉ. विखे पाटील यांनी रहिवाशी व स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक राहाता बाजार समितीत घेतली. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, मोहन सदाफळ, संजू सदाफळ, डॉ स्वाधीन गाडेकर, नगराध्यक्ष, विजय सदाफळ उपनगराध्यक्ष नगरसेवक कैलास सदाफळ, मुन्ना शहा, राजेंद्र निकाळे, सुधाकर दंडवते, प्रदिपभाऊ ( पप्पू भाऊ)बनसोडे,राजुभाई पठाण ( पत्रकार )कानीफ बावके, संदिप दंडवते, भारत बनसोडे, सचिन बनसोडे, शिवाजी नजन,सतिश बावके, विकास बावके, स्वप्नील बावके,अंकुश भडांगे,हरिश श्रीखडे, रमेश गायकवाड, पप्पू बनसोडे, बबन बनसोडे, अक्षय रोहोम, बाबासाहेब डांगे, रावसाहेब बनसोडे, पुंडलिक बावके, नंदा माळी, चंद्रकांत बनसोडे, शब्बीर शेख,अकबर शेख,बाळू जाधव, सुनील लोखंडे, दीपक शिंदे, दीपक दंडवते, सलमान पठाण,फिरोज पठाण,,शब्बीर शहा,किशोर दंडवते झुंबर शिंदे,अरुण गुजर,बबलू खरात,मनोज डुकरे,आदी यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, राहाता येथील 340 आणि साकुरीची गोदावरी वसाहत या जागेबाबत अनेक मोठ्या तंत्रिका अडचणी निर्माण झाल्या होत्या. जागा वनविभागाची आहे आणि अनेक अडचणी येतील अशी काहींनी शंका उपस्थित केली होती. परंतु सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द पूर्ण करतात, हा सर्व सामान्य जनतेला विश्वास होता. आणि आपण या बाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून विश्वास सार्थ ठरवला. या जागेच्या बाबतीत सर्वात मोठी अडचण सातबाऱ्यावर सरकार असे नाव लागले होते. गुंतागुंत वाढली होती. परंतु दोन दिवस आधी आपण महाराष्ट्र शासन असे नाव लावून घेतले. त्या मुळे आता कायदेशीररित्या स्थानिक नागरिकांच्या नावावर जागा करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या मुळे तुमची जागा तुमच्या नावावर फक्त आणि फक्त सुजय विखे च करू शकतो! असे सांगून डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, अनेक वर्षापासून जागा नावावर करण्याचा संघर्ष 340 व गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे संपला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा प्रश्न सोडविला. विधानसभेच्या निवडणुकीत तुमची जागा तुमच्या नावावर करून देतो हा शब्द आपण पाळला. याचा आपल्याला अभिमान आहे. आपण राजकारणात ऐश्वर्य कमावले, वैभव कमावले परंतु आपण विश्वासाहर्ता कमावली हा मोठा आनंद आहे. शिर्डीतील लक्ष्मीनगर भागातील आपल्या शब्दावर काढले. पोलिस फाटा लागला नाही. त्या मुळे आता प्रत्येकाच्या नावावर 25 लाख रुपये किमतीची जागा झाली आहे.
सर्वांच्या विश्वासामुळे पालिकेत निर्विवाद सत्ता मिळाली. साकुरीतही आपण 5 कोटींचे कामे करू शकलो. अंतर्गत गटारी, रस्त्यांचे कामे मार्गी लागली. तुम्ही सर्वजण मतभेद विसरून एकत्र आला म्हणून हे शक्य झाले. राहाता शहराला किती निधी दिला. हे मी आत्ता सांगणार नाही.
मतदार संघात धर्म, जात याला थारा देणार नाही. गुन्हेगारीला साथ देऊ नका. आपल्याला मतदार संघातील गुन्हेगारी मोडीत काढायची आहे. मुलींची कुणी छेड काढत असेल तर त्याच्या घरावर बुलडोझर चालविण्यास मागे पुढे पाहणार नाही. असा इशारा डॉ. विखे पाटील यांनी गुन्हेगारांना दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!