Homeताज्या बातम्याकुणी कौतुक करो या टीका,लाभ आपलाच आहे. कारण कौतुक प्रेरणा देते, तर...

कुणी कौतुक करो या टीका,लाभ आपलाच आहे. कारण कौतुक प्रेरणा देते, तर टीका प्रतिउत्तर.. सौ मेघना संदीप दंडवते.

*आपल्या साकुरी गावच्या शिरेपेचात मानाचा आणखी एक तुरा*….. साकुरी च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय मेघना संदीप दंडवते यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा मानाचा व प्रतिष्ठेचा *”आदर्श सरपंच पुरस्कार”* मिळाल्याबद्दल सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा…. पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील असो, तो मिळण्यासाठी करावे लागतात ते अफाट कष्ट,मेहनत व असावी लागते ग्रामसुधारणेची अद्भुत जिद्द…. जी सध्याच्या सरपंच मेघनाताई यांच्याकडे आहे. ही जिद्द, ही तळमळ गेल्या तीन-साडेतीन वर्षातील साकुरी गावात केलेल्या विविध विकास कामातून आपल्याला स्पष्टपणे जाणवते.वेळ-प्रसंग कोणताही असो,ऊन-वारा -पाऊस, दिवस – रात्र काहीही न बघता केवळ समाजासाठी,गोरगरिबांसाठी व समाजातील सर्व घटकांसाठी शासनाकडून आलेली प्रत्येक योजना कशा राबवता येईल व त्यातून गावाचा विकास कसा होईल.हे सदैव लक्षात ठेवूनच त्यांनी आपले मार्गक्रमण केले आहे.गावाचा, समाजाचा विकास करण्यासाठी दूरदृष्टी आवश्यक असते,या दूरदृष्टीनेच सन्माननीय सरपंचांनी आपल्या गावचा विकास कसा होईल,गावातील रस्ते, ड्रेनेज,लाईटची सुविधा या पायाभूत सुविधा मध्ये निश्चित चांगली कामे करत आहात मागील वर्षी दुष्काळ पडायचं सावट असताना रोडच्या अंडरग्राउंड पाईपलाईन करून नदी मधून बारवा मध्ये पाणी घेतले तसेच ग्रामपंचायत कार्यालय पुढे बोर घेतले त्याला पण खूप पाणी लागले गोदावरी वसाहत बोरवेल ते शेजारच्या तळ्याच्या विहिरीत पाणी घेतलं त्याला पण भरपूर पाणी लागले आज एवढा कड़क उन्हाळा असून सुद्धा कुठेही पाण्याची कमतरता काही काही कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागले शिर्डी शिवाला अनाधिकृत 25 ते 30 कनेक्शन हॉटेल वलॉजिंग चे तोडावे लागले काही कामगारांच्या बदल्या कराव्या लागल्या त्या ठिकाणी कुठलीही तडजोड केली जात नाही. महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली महिला सबलीकरण च्या माध्यमातून हळदीकुंकू, होम मिनिस्टर, मुलींसाठी मोफत कराटेचे प्रशिक्षण, आरोग्य शिबिर, क्रिकेटच्या स्पर्धा या माध्यमातून एक मोठी संघटना उभी केली विशेष करून कोण गरीब कोण श्रीमंत याचा अजिबात विचार न करता सर्व समाजातील महिलांना योग्य न्याय द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे, गावातील शाळांना डिजिटल बोर्ड व्यायाम शाळा, कॅमेरे ,शैक्षणिक साहित्य व ज्या- ज्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या सर्व देण्याचा अत्यंत प्रामाणिक पणे प्रयत्न केला आहे . जिथे कुठे वाद होईल अन्याय होईल त्या स्वतः त्या ठिकाणी उभ्या राहून त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करत असतात आज हक्काने महिला सरपंच सरपंच असताना सर्वसामान्य नागरिक त्यांना हक्काने आपल्या समस्या त्यांना फोन करून मांडत असतात साकुरी हे मोठं व्यापारी केंद्र बनलेला आहे प्रशासनावर धाक असल्याकारणाने अनेक मोठमोठे उद्योग व व्यापार साकुरीत तीन-चार वर्षात सुरू झालेला आहे त्यामुळे आज बाहेरील उद्योजक,व्यापारी किंवा महिला असतील यांना सुरक्षिततेची भावना या गावांमध्ये निर्माण झालेली आहे.हा आदर आणि हा विश्वास त्यांनी आपल्या कामातून कमावलेला आहे.या सर्व कामांची पावती म्हणूनच त्यांना देशातील एक मोठ्या असणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समूहाचा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे.

*”कुणी कौतुक करो या टीका,लाभ आपलाच आहे.कारण कौतुक प्रेरणा देते,तर टीका प्रत्युत्तर!”* याप्रमाणे या राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री *माननीय नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील , व युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील* या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कितीही संकटे आली कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी *”निंदकाचे घर असावे शेजारी,अंगणी अंगणी पाणी ! निंदक आमुची काशी, आमची पातके अवघी नाशी!”* याउक्तीप्रमाणे मा.सरपंच आपल्या ग्राम सुधारणेचा वसा यापुढे सुरूच ठेवतील या सदिच्छेसह पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा….यावेळी उपसरपंच सविता नजन,दिलीप बनसोडे,लता आरणे, रूपाली रोहोम कल्पना रोहोम, पुंडलिक बावके, शिवाजी नजन,श्रद्धा दंडवते, गीतांजली श्रीखंडे,संदीप दंडवते , ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत, शिंगारे व ग्रामपंचायत कर्मचारी आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!