Homeआरोग्यस्वच्छता आणि पर्यावरणासाठी मोठे पाऊल; लोणी खुर्दमध्ये अत्याधुनिक प्रकल्पांची सुरुवात—-डॉ सुजय विखे...

स्वच्छता आणि पर्यावरणासाठी मोठे पाऊल; लोणी खुर्दमध्ये अत्याधुनिक प्रकल्पांची सुरुवात—-डॉ सुजय विखे पाटील

लोणी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील चिकन-मटण मार्केट परिसरात स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. सुमारे ५० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली अत्याधुनिक पशुदाहिनी तसेच ९३ लाख रुपये खर्चाचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प अशा एकूण १ कोटी ४३ लाख रुपयांच्या या दोन प्रकल्पांमुळे परिसरातील स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असल्याचे मत डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केले.

हा प्रकल्प जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असून स्वच्छता व पर्यावरण व्यवस्थापनाच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, संचालक राहुल धावणे पाटील, संचालक दत्तात्रय गोरे पाटील, संचालक दिलीपराव गाडेकर, सचिव एस. मोटे तसेच व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, चिकन व मटण मार्केटमधील अवशेषांची शास्त्रोक्त व सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेली ही पशुदाहिनी जिल्ह्यातील अशा प्रकारची पहिलीच अत्याधुनिक सुविधा आहे. या दाहिनीत टाकण्यात येणारे अवशेष पूर्णपणे जळून त्याची राख तयार होते. विशेष म्हणजे, या राखेचा पुढील काळात सेंद्रिय खत म्हणून उपयोग केला जाणार असून पर्यावरणपूरक व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण होणार आहे.

या प्रकल्पामुळे सांडपाण्याचे योग्य प्रकारे शुद्धीकरण होऊन परिसरातील स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागणार असून स्थानिक नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमादरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. विखे पाटील यांनी व्यापारी व ग्रामस्थांशी संवाद साधत स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व आधुनिक सुविधा उभारणीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकल्पांमुळे बाजारपेठ परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी राहण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोणी परिसरात राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!