Homeताज्या बातम्यासातबारा कोरा केव्हा होणार?-सौ प्रभावती घोगरे यांचा सरकारला थेट सवाल राहाता...

सातबारा कोरा केव्हा होणार?-सौ प्रभावती घोगरे यांचा सरकारला थेट सवाल राहाता तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार -शेतकरी मोर्चातून शासनाविरोधात तीव्र घोषणा

‘सातबारा कोरा केव्हा होणार?’ – सौ. प्रभावती घोगरे यांचा सरकारला थेट सवाल

राहाता तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार – शेतकरी मोर्चातून शासनाविरोधात तीव्र घोषणा

राहाता (प्रतिनिधी) –
“सातबारा कोरा केव्हा होणार?” असा थेट आणि संतप्त सवाल सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
२४ जुलै २०२५ रोजी राहाता येथे आयोजित शेतकरी मोर्चादरम्यान त्यांनी सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या धोरणांवर जोरदार टीका केली.

वीरभद्र मंदिर ते तहसील कार्यालय, राहाता असा भव्य मोर्चा काढण्यात आला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

मोर्चात विशेष लक्ष वेधून घेतले शेतकरी व्यथा मांडणाऱ्या बैलगाडीने आणि आसूड मारणाऱ्या पोतराजाने. त्यातून शासनाच्या संवेदनशून्य धोरणांचा निषेध करण्यात आला. नगर-मनमाड रस्त्यावर पत्यांची उधळण करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आला.

तहसील कार्यालयावर निवेदन सादर करताना सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या:

> “शासनाने निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करणार, कर्जमाफी देणार, हमीभाव देणार, दुधाला दर देणार अशी आश्वासने दिली. पण आज शेतकरीच शेतात मेलाय आणि सरकार गप्प बसलेय. हे फक्त बोलण्याचं सरकार आहे… कामाचं नाही! सातबारा अजूनही तसाच आहे. मग सरकार काय झोपलंय का?”

मोर्चामधून मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
* सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी
* सातबारा कोरा तातडीने करावा
* पीकविमा खात्यावर जमा करावा
* वीजबिल माफ करावे
* शेतमालाला हमीभाव मिळावा
* दुधाला किमान ₹५० प्रति लिटर दर मिळावा.

मोर्चात सौ. प्रभावती घोगरे, डॉ.एकनाथ गोंदकर, ॲड.पंकज लोंढे, सुहासराव वहाडणे, सचिन कोते, सचिन चौगुले, भगवानराव टिळेकर, धनंजय गाडेकर, अनिल बोठे, विक्रांत दंडवते, अनिल गाढवे, नानासाहेब नळे, ज्ञानेश्वर वर्पे, उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, उत्तमराव मते, विजय मोगले, विठ्ठलराव शेळके, गणेश सोमवंशी, शशिकांत लोळगे, रणजीत बोठे, सोमनाथ गोरे, बाळासाहेब आहेर, चंद्रभान धनवटे, बाळासाहेब गिधाड, भानुदास कातोरे, गंगाधर बेंद्रे, सचिन गाडेकर, अमृत गायके, संजय डांगे, सौरभ शेळके,मुन्ना फिटर, राजेंद्र निर्मळ, अक्षय गोर्डे, दिनेश शेळके, वसंतराव काळे, कानिफनाथ तांबे, योगेश सातपुते, अमोल घोगरे, सचिन मुन्ना आहेर, श्याम घोगरे, निलेश शेळके, अमोल बनसोडे, पुंडलिक बावके, अजय साळुंखे,बबन डांगे ,बाबासाहेब डांगे, सुरेश गुगळे, संदीप शिरसागर, जगन सरोदे,गणेश सोनवणे,किशोर त्रिभुवन, सतीश रोहम,विशाल वाघमारे, दीपक सोळंकी, अभिजीत बोठे, सोमनाथ जेजुरकर तसेच महिला सुजाता घोगरे, वर्षाताई घोगरे, लोणी खु.ग्रामपंचायत सदस्य आशा आहेर, सुनिता कोरडे तसेच अनेक महिला आदींसह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी “सातबारा कोरा करा!”, “शेतकरी जगला पाहिजे!” अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केला .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रद्धा आणि सबुरी चा संदेश जगाला देणाऱ्या साईनगरीत रुग्णसेवेची परंपरा आज ही अखंडपणे सुरू,मोफत...

शिर्डी (प्रतिनिधी) : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगाला देणाऱ्या साईनगरीत रुग्णसेवेची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. याच सेवाभावी परंपरेला पुढे नेत कनकुरी रोडलगत श्री...

AI mural inspired by Banksy sparks backlash in Bristol: Artists spot wrong landmarks and...

Representational image(Istock) At first glance, the huge mural on the side of a Bristol pub looks like a colourful celebration of the city....

अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय-जामखेडच्या डॉ मिसबाह शेख यांचा ऐतिहासिक बहुमान

*अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय - जामखेडच्या डॉ. मिसबाह शेख यांचा ऐतिहासिक बहुमान* *जामखेड | शिर्डी आवाज न्यूज नेटवर्क* ग्रामीण भागातून येऊन मोठं स्वप्न पाहणं...

11 tehsils reel, activists seek crop inspections

A Solapur farmer walks through his through his dry sugar cane field Pune: Farmers and activists in Solapur have urged the administration to...

Sreeshankar, Solomon reach long jump final as Tejaswin slips to third in decathlon

India's Murali Sreeshankar (PTI Photo) Nagoya: Murali Sreeshankar and David Patturaj Solomon advanced to the men's long jump final at the ongoing Asian...

error: Content is protected !!