Homeताज्या बातम्यासाकुरीच्या महिला सरपंच सौ मेघना संदीप दंडवते यांची कार्यतत्परता,समयसुचक निर्णयामुळे मोठा अनर्थ...

साकुरीच्या महिला सरपंच सौ मेघना संदीप दंडवते यांची कार्यतत्परता,समयसुचक निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला

साकुरीच्या महिला सरपंच सौ. मेघना संदीप दंडवते यांची कार्यतत्परता; समयसूचक निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला

साकुरी (प्रतिनिधी): साकुरी गावातील उपासणी नगर परिसरात लुटे बंधू यांच्या फरसाण निर्मिती कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना आज घडली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या संपूर्ण घटनेत साकुरी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ. मेघना संदीप दंडवते यांनी दाखविलेल्या समयसूचकता व कार्यतत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर उपासणी नगर परिसरातील एका नागरिकाने सरपंच सौ. मेघना दंडवते यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्या त्यावेळी गावाबाहेर असतानाही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे सर यांच्याशी तातडीने संपर्क साधला व अग्निशमन दलाची मदत मागवली.

सरपंचांच्या तत्पर पाठपुराव्यामुळे काही मिनिटांतच राहाता नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे आग अधिक पसरून शेजारील घरे व इतर मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याचा धोका टळला.

या दुर्घटनेत कारखान्यातील यंत्रसामग्री, कच्चा माल व तयार माल जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून केवळ वित्तहानी झाली आहे.

संकटकाळात दाखविलेली निर्णयक्षमता, प्रशासनाशी साधलेला तातडीचा समन्वय आणि गावाच्या सुरक्षिततेसाठी केलेली धडपड यामुळे सरपंच सौ. मेघना संदीप दंडवते यांच्या कार्याचे ग्रामस्थ, सामाजिक संघटना तसेच विविध स्तरांतील नागरिकांकडून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे सरपंच सौ मेघना संदीप दंडवते व संदीप दंडवते परिवारासह देवगड येथे दर्शना साठी गेलेले असताना ही तेथूनच मोबाईल वर सर्व माहिती घेऊन सूचना केल्या.संकटाच्या क्षणी लोकप्रतिनिधींनी कशी जबाबदारी पार पाडावी, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Vincent Van Gogh Quote: Quote of the day by Vincent Van Gogh: “The heart...

Starry Night by Vincent van Gogh (Photo via Canva) Vincent van Gogh was a Dutch painter who is remembered today as one of...

Pawar writes to CM, demands special session, Rs1 lakh per hectare for farmers

Pune: NCP (SP) chief and Rajya Sabha MP Sharad Pawar has urged chief minister Devendra Fadnavis to convene a three-day special session...

Virat Kohli’s record-breaking night: 15,000 ODI runs, 55th century and more – full list

Virat Kohli's century against West Indies on Sunday was not just another hundred. It came with a string of milestones and records...

Powerful nor’easter pounds US Northeast, triggers severe flooding and widespread outages

Tidal flooding reaches homes, as a strong nor'easter coastal storm batters the US northeast coast, in Hampton, New Hampshire, US Residents of coastal...

‘Maine last dedh saal se Indian khana banana aur chhoda hua hai’: Delhi man...

For some people, getting fit means counting calories, hitting the gym regularly and finding a diet they can actually stick to. For...

error: Content is protected !!