साकुरीत पल्स पोलिओ मोहीम योग्य नियोजनात संपन्न
28 जून 2026 रोजी साकुरी गावात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. गावातील 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी लसीकरण साठी साकुरी गावात प्रत्येक वार्डात बुथ लावण्यात आले होते. गावातील बालकांसह बाहेरील बालकांनाही यावेळेस लसीकरणाचा लाभ देण्यात आला. नजन वस्ती वीट भट्टी परिसरात गावातील बालकांबरोबर बाहेरील राज्यातील कामगारांचे ५ वर्षाखालील मुलांना डोस देण्यात आले. साकुरी-शिर्डी शिव येथील बुथवर साईभक्त व नाशिक, गुजरात लातूर पुना आंध्रप्रदेश बाहेरील नागरिकांचे लहान मुलांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. गोदावरी वसाहत येथे राहणारे व बाहेरील राज्यातील कामगार यांचे लहान मुलांना डोज पाजण्यात आले. उपासनी महाराज संस्थान येथे गावातील बालकांबरोबर मुंबई नागपूर येथील भाविकानी त्यांच्या पाच वर्षा आतील मुलांना पोलिओचे लाभ घेतला. बनसोडे वस्ती येथे परिसरा बरोबर सर्व शेतकरी कुटुंब मजूर डाळिंब द्राक्ष बागाचे मजूर यांचे मुलांनी याचा लाभ घेतला यावेळी साकुरी गावच्या सरपंच मेघना संदीप दंडवते उपसरपंच सविता शिवाजी नजन यांनी दिवसभर सर्व बुथवर भेटी दिल्या व सर्व व्यवस्था ठेवली. सर्व याकामी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र साकुरीचे समुदायिक आरोग्य अधिकारी श्री डॉक्टर प्रकाश म्हस्के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रज्ञा भगत डॉक्टर नितीन तुपे आरोग्य सेविका श्रीमती दिवेकर श्रीमती महानोर आर बी आरोग्य सेवक श्री संकेत कदम श्री उम्मीद चांदेकर श्री अनिल पवार आशा गटप्रवर्तक श्रीमती नेमाडे वि पी आशा स्वयंसेविका सौ सविता धापटकर सविता आगवन शोभा भालेराव आशा रेवगडे श्रीमती उज्वला उपाध्ये सौ अनिता माळवदे सौ संगीता शेलार सविता दाभाडे श्रीमती हर्षली जाधव अंगणवाडी सेविका सौ योगिता भुजबळ कांता नजन सौ सुनीता बिबे विमल बनसोडे सविता सोनवणे सौ सीमा पानसरे संगीता रानडे अनुराधा शिंदे व मंजुळाबाई भालेराव व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक यांनी सदर मोहीम यशस्वीपणे राबविली.





















