Homeताज्या बातम्यासाई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सभासदांना...

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सभासदांना दिवाळी शिदा वाटप!

7 ऑक्टोबर 2025

शिर्डी प्रतिनिधी

महाराष्ट्रात नावं लौकिक असलेल्या साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी तर्फे सोमवारी साई उद्यान येथे सभासदांना दिवाळी शिधा वाटपाचा कार्यक्रम डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला. सध्या सोसायटीचे चेयरमन विठ्ठल पवार यांचे काम खूप चांगले असून ते भाविकांचे व कर्मचाऱ्यांचे हित जोपासत अनेक धाडसी निर्णय घेऊन या सोसायटीचे नावं राज्यात अग्रस्थानी नेले आहे अशा शब्दात डॉ. सुजय विखे पाटील यांनी विठ्ठल पवार व सर्वं संचालकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमामध्ये डॉ.सुजय विखे पाटील यांच्या तुफान फटकेबाजीची जोरदार चर्चा सध्या शिर्डीत रंगली आहे, कारण सोमवारी शिर्डी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे अनुसूचित महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले, काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष पदाचे आरक्षणाचे भाकीत विखे पाटील यांनी केले होते, ते आज सत्यात उतरले असून हा योगायोग असून ही साईंची मर्जी आहे, त्यामुळे हा निर्णय सर्वांनी स्वीकारला पाहिजे शेवटी ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. असं म्हणत सध्या आरक्षित झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी अनेकजन इच्छुक आहे मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कोणत्याही उमेदवाराला आम्ही उमेदवारी देणार नाही. तसेच शिर्डीतील सर्वं ग्रामस्थ, सर्वं पक्षांचे पादाधिकारी यांनी सुचविलेल्या नावावर त्यालाच उमेदवारी देणार असून, शिर्डी गावचा इतिहास, भौगोलिक अभ्यास, गावासाठी दिलेले योगदान, जनसंपर्क तसेच अनुभव असणाऱ्या सुशिक्षित उमेदवाराचा निश्चित विचार केला जाईल असही विखे पाटील म्हणाले. मात्र आरक्षणाची सोडत मनासारखी न निघाल्यामुळे शिर्डीतील अनेक दिग्गज नेत्यांचे स्वप्न भंगले तर प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी आपली नाराजी एका फ्लेक्स बोर्डाच्या माध्यमातून प्रकट केली. त्या बॉर्डवर शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला दादांनी मारलं! असा उल्लेख करून खाली डॉ.सुजय विखे पाटील यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत जय हिंद, जय महाराष्ट्र असा शब्दाप्रयोग केल्याने कैलाबापूंची नाराजी उघड उघड दिसत होती तर भविष्यात बापू कोणता निर्णय घेणार हे पहाणे महत्वाचे ठरणार असून सध्या शिर्डीतील राजकीय गणितं खूप गुंतागुंतीचे झाले आहे. अशातच शिर्डी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी शिर्डीचे जेष्ठ पत्रकार राजेंद्र भुजबळ यांच्या पत्नीचे नाव समाजसेविका सौ स्वातिताई राजेंद्र भुजबळ आघाडीवर आहे तर, सौ. सविता नितीन शेजवळ,सुरेश आरणे,जयश्री विष्णू थोरात,मंगेश त्रिभुवन, यांचेही नाव चर्चेत आहे. आता या नावापेक्षाही अनेक इच्छुक उमेदवार असून इतक्या मोठ्या भाऊंगर्दीत नेमकी कुणाची लॉटरी लागते आणि कुणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ मतदार घालतात याकडे संपूर्ण शिर्डी गावाचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Josh Hazlewood makes Australian Test history, joins elite club with 300th wicket

Josh Hazlewood of Australia, right, celebrates (AP) Josh Hazlewood reached a major milestone in his Test career on Saturday, becoming the ninth Australian...

30 Tests, 30 venues: Yashavi Jaiswal follows Sachin Tendulkar’s footsteps with rare feat

Yashavi Jaiswal (BCCI Photo) When Yashasvi Jaiswal walked out to bat in Galle for the first Test against Sri Lanka, he was playing...

*राहात्यात मैड स्पेशियालिटी हॉस्पिटलमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; पीआय दिपक सरोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण*

  *राहात्यात मैड स्पेशियालिटी हॉस्पिटलमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; पीआय दिपक सरोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण* *राहाता:* राहाता येथील प्रसिद्ध *मैड स्पेशियालिटी हॉस्पिटल* येथे *80 वा स्वातंत्र्य दिन*...

Psychology says people who prefer staying home on weekends may simply be recharging, not...

For many people, the ideal weekend does not involve a packed calendar, crowded venues or a string of social plans. It might...

Case against man for outraging modesty of 14-year-old girl

Pune: Pune Rural police on Friday registered a case against a man from Pune city on the charge of outraging the modesty...

error: Content is protected !!