ब्रेकिंग न्यूज
Devdutt Padikkal’s 131 headlines India’s dominant Day 1 at 288/2 in Galle on Independence DayDoom! Board lowers the boom on Indian-American CEO who fired 900 employees over Zoomश्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित,श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी येथे “*भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा*”उत्साहात संपन्न—सौ वैशालीताई चौधरी ( सरचिटणीस स्थानीय महिला महिला मंडळ )*शारदा शैक्षणिक संकुलात राष्ट्रध्वजाला वंदन*-श्री रमेशभाऊ शिंदे (अध्यक्ष )Trisha Krishnan keeps it classic in a mustard saree as she attends CM Vijay’s first Independence Day ceremonyDeserter from CRPF arrested for stealing motorcycles; 19 bikes recoveredJosh Hazlewood makes Australian Test history, joins elite club with 300th wicket30 Tests, 30 venues: Yashavi Jaiswal follows Sachin Tendulkar’s footsteps with rare feat*राहात्यात मैड स्पेशियालिटी हॉस्पिटलमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; पीआय दिपक सरोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण*Psychology says people who prefer staying home on weekends may simply be recharging, not avoiding others

श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित,श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता-राहाता जि-अहिल्यानगर येथे आज शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी”*भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा*”उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ध्वजारोहण मा.श्री मनोज उपाध्ये, राहाता यांच्या शुभहस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री निलेश चोरडिया व कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ.वैशालीताई चौधरी या उपस्थित होत्या.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयात विविध उपक्रम घेण्यात आले. सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत गायन, तालबद्ध कवायत संचलन, डंबेल्स तसेच विद्यार्थ्यांचे “हर घर तिरंगा” या गीतावर समूह नृत्य सादर करण्यात आले.विद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमात प्रावीण्य मिळविलेल्या मुक-बधिर विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
विद्यालयात होणारे विविध उपक्रम, मुक-बधिर विद्यार्थ्यांना करण्यात आलेले ज्ञानदान आणि विद्यार्थ्यांचा होत असलेला विकास पाहून पुनमताई उपाध्ये भारावून गेल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. विद्यालयाचे संस्थापक मा.माधवराव चौधरी सर यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. हा विकास पाहून सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असे मत मनोज उपाध्ये यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी रूपालीताई चोरडिया, दिनेश चोरडिया, पूनम ताई उपाध्ये ,सुदामभाऊ गोंदकर, सुनील कोल्हे, श्री संतोष ढगे , मा. मुख्याध्यापक बाळासाहेब कासार सर, अभिषेक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री नवनाथ ढवळे सर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बबन सोळसे सर यांनी केले तर आभार श्री रवींद्र मोरे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यालय वसतिगृह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.




















