Homeताज्या बातम्याश्रद्धा आणि सबुरीच्या संस्कारांची ३२ वर्षांची परंपरा; शिर्डीत साई सच्चरित पारायण सोहळा

श्रद्धा आणि सबुरीच्या संस्कारांची ३२ वर्षांची परंपरा; शिर्डीत साई सच्चरित पारायण सोहळा

श्रद्धा आणि सबुरीच्या संस्कारांची ३२ वर्षांची परंपरा; शिर्डीत साई सच्चरित पारायण सोहळा

शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या पावन भूमीत गेल्या ३२ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पारायण सोहळ्यास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन साईचरित्राचे श्रवण केले आणि विखे पाटील परिवाराच्या वतीने भाविकांना शुभेच्छा दिल्या.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी नाट्य रसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३२ वर्षांपासून सुरू असलेली ही आध्यात्मिक परंपरा शिर्डीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. शिर्डी, पंचक्रोशी, राहाता तालुका तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने माता-भगिनी आणि साईभक्त या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

गेली ३२ वर्षे अखंडपणे सुरू असलेला हा पारायण सोहळा श्रद्धा, सबुरी, संस्कार आणि सामाजिक एकोप्याची परंपरा जपणारा आहे. साईबाबांच्या पावन भूमीत एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनी आणि भाविक सहभागी होत आहेत, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने शिर्डी परिसरात आनंददायी, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू,असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

विखे पाटील परिवाराच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. मागील वर्षी शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही महिलांसाठी धार्मिक अथवा सांस्कृतिक स्वरूपाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने साईकार्यासाठी एक लाख रुपयांचे योगदान देण्यात आले. तसेच ग्रामस्थांसमवेत अल्पोपहाराचा आस्वाद घेत डॉ. विखे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.साईबाबांच्या कृपेने सर्वांचे जीवन सुखी, समृद्ध, निरोगी आणि आनंदमय व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी भाविक भक्त, माता-भगिनी, ग्रामस्थ,राष्ट्रवादी चे नेते रमेशभाऊ गोंदकर,प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते,राष्ट्रवादी अध्यक्ष दिपकभाऊ गोंदकर यांच्यासह मान्यवर,सर्व नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

10 baby girl names drawn from ancient texts and mythologies associated with wisdom

Minerva was the Roman goddess of wisdom, intellect, learning, arts and strategic warfare. She was the Roman counterpart of the Greek Athena and became...

11-year-old dies after falling under truck as bike skids on broken road in Pune

An 11-year-old boy tragically died after falling under a truck's wheels in Pune PUNE: An 11-year-old boy died after coming under the wheels...

India vs South Africa Live Score, Hockey World Cup 2026: India eye crucial win...

India vs South Africa Live Score, Hockey World Cup 2026: A hard-fought draw against one of the world's best teams has given India confidence,...

After 1,800 km dash, reserves Ashith Surya-Amrutha Pramuthesh endure golden point heartbreak

Ashith Surya and Amrutha Pramuthesh in action on Day 2. New Delhi: Ashith Surya and Amrutha Pramuthesh were competing in the mixed doubles...

*शिर्डी तालुका काँग्रेसला नवीन तालुकाध्यक्ष* *सचिन चौगुले यांची निवड जाहीर*

*शिर्डी तालुका काँग्रेसला नवीन तालुकाध्यक्ष* *सचिन चौगुले यांची निवड जाहीर* *शिर्डी*: दि. 17/07/2026 रोजी झालेल्या *"संघटन सृजन अभियान"* या देशव्यापी कार्यक्रमानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शिर्डी...

error: Content is protected !!