*शिक्षणाला वयाची मर्यादा नाही हे प्रा. पवार यांच्या यशातून दिसते प्रा. आदित्य दंडवते*
प्रा. अनिल पवार स्वतः शिक्षण घेऊन पदव्या संपादन करत असताना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बौद्धिक बळ व मार्गदर्शन देऊन त्यांचे अधिकारी बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घेत आहेत शिक्षणाला वयाची मर्यादा किंवा नोकरीचा अडसर कधीच येत नाही हे प्राध्यापक अनिल पवार यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन अधोरेखित केले आहे असे मत फिनिक्स अभ्यासिकेचे संचालक प्रा आदित्य दंडवते यांनी व्यक्त केले
प्रा पवार श्री साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये वरिष्ठ सिटीस्कॅन तंत्रज्ञान म्हणून कार्यरत आहेत तसेच त्यांनी सेट 2025 मध्ये पर्यावरण शास्त्र विषयात उत्तीर्ण झाली आहेत राहता येथील सीएम दंडवते पाटील फाउंडेशनच्या फिनिक्स अभ्यासिकेचे ते संचालक देखील आहेत तसेच अभ्यासिकेतील स्वप्नील नळे या विद्यार्थ्याची आय डी बी आय बँकेत ज्युनिअर सहायक व्यवस्थापक पदी निवड झाली असून त्याची पोस्टिंग गुजरात मध्ये पालनपूर येथे नियुक्ती मिळाली आहे ,स्वप्नील हा अस्तगाव येथील शिक्षक श्री चंद्रभान नळे यांचा चिरंजीव आहे त्याने कृषी मध्ये पदवी संपादन केलेली आहे , तसेच फिनिक्स अभ्यासिकेतील विद्यार्थी प्रतीक संजय शिंदे यांची एम पी एस सी ने घेतलेल्या संयुक्त सेवा परीक्षेतून महाराष्ट्रातून १७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्याची महाराष्ट्र शासनात राज्य विक्री कर निरीक्षक व सहायक कक्ष अधिकारी मंत्रालय या दोन पदावर निवड झाली असून सध्या ते रुई येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या सर्वांचे अभिनंदन फिनिक्स अभ्यासिका राहता चे संस्थापक श्री दीपकराव दंडवते पाटील ,अभ्यासिकेचे मार्गदर्शक श्री नागेश गायकवाड, ACP सोलापूर ,श्री विनायक कोते पाटील DYSP , नायब तहसीलदार श्री हेमंत पाटील साहेब पत्रकार सतीश दादा वैजापूरकर पत्रकार दिलीप खरात पत्रकार बाळासाहेब सोनवणे पत्रकार किरण वाबळे व सर्व विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ..




















