साकुरी ग्रामपंचायतने नँशनल हायवेवर मैलामिश्रित पाणी रस्त्यावरच सोडल्याने आठ ते दहा दुचाकीस्वार जखमी झाले काहींना फ्रँक्चर झाले हा प्रकार अतिशय निंदणीय असुन लोकांच्या जिवाशी खेळणे बंद करा अशी संतप्त भावना भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केली.
राष्टीय महामार्गावर साकुरी ग्रामपंचायतीने मैलामिश्रित पाणी रस्त्यावर सोडल्याने आठ ते दहा दुचाकीस्वार जखमी झाले, त्यापैकी काहींना फॅक्चर झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी घटनास्थळी भेट दिली. पिपाडांसमोरच दुकाचाकीस्वार घसरुण पडले. काहींना मेंदुला मार लागल्यामुळे त्यांना नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सुमारे एक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या मैलामिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार खेदजनक आहे, असे मत डॉ. पिपाडा यांनी व्यक्त केले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून महामार्गावर घाण पाणी सोडणे त्वरित थांबवण्याची सूचना केली. खरेतर, राहाता किंवा शिर्डी नगरपालिकेची जेटिंग मशीन बोलावून हे काम करणे आवश्यक होते, मात्र कोणताही विचार न करता बेजबाबदारपणे हे पाणी महामार्गावर सोडणे संतापजनक आहे.
चौकट-
(नागरिकांमध्ये संताप – या घाण पाण्यामुळे संपूर्ण एक कि.मी. पर्यंतच्या परिसरात मैल्याच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली होती. साकुरी ग्रामपंचायतीच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. “महामार्गावर मैलायुक्त पाणी सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे भान साकुरी ग्रामपंचायतीला राहिले नाही,” अशी खंत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केली. वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क करुन हायवेवर मैलायुक्त पाणी सोडणे योग्य आहे काय अशी संतप्त भावना पिपाडांनी व्यक्त केली. )





















