*राहाता: शारदा संकुलात स्वातंत्र्य सेनानी कै. कारभारी शिंदे स्मृती दिन व शिक्षक दिन सोहळा*

*राहाता, ता. ३:* रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल, राहाता येथे थोर स्वातंत्र्य सेनानी कै. कारभारी लक्ष्मण पा. शिंदे पाटील यांचा स्मृती दिन व शिक्षक दिन सोहळा शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ०९:३० वाजता संपन्न होत आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अॅड. श्री. नारायणराव कार्ले पाटील (मा. चेअरमन, गणेश सह. साखर कारखाना, गणेशनगर) हे असणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून राहाता नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. डॉ. श्री. स्वाधिन किसनराव गाडेकर, उप नगराध्यक्ष मा. श्री. विजय पुंडलीक पा. सदाफळ, नाशिक येथील निश्री राऊत फाउंडेशनचे सचिव मा. प्रा. लक्ष्मणराव गोर्डे, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे सहा. विभागीय अधिकारी मा. श्री. प्रमोद तोरणे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून राहाता नगरपालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
हा सोहळा समन्वय समितीचे सदस्य श्री. रमेशभाऊ शिंदे पा., शारदा कन्या विद्या मंदिराचे प्र. मुख्याध्यापक श्री. राजकुमार साळवे, शारदा शैक्षणिक संकुलाच्या प्र. प्राचार्य श्रीमती शिला संसारे, एज्युटॉप स्कूलच्या प्रिन्सिपॉल सौ. निशा चेंगोट व शारदा ज्युनि. कॉलेजचे प्र. उपप्राचार्य श्री. शाम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
कार्यक्रमास सर्व पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंद, स्थानिक शाळा समिती सदस्य, सल्लागार समिती सदस्य, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





















