*राहाता शहरात वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ संत श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात; २० जेष्ठ नागरिकांना समाज गौरव पुरस्काराने गौरव*

*राहाता (प्रतिनिधी) – राजुभाई पठाण | LIVE शिर्डी आवाज न्यूज*
वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ संत आणि नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे आयोजन राहाता शहरात मोठ्या भक्तिभावात करण्यात आले आहे.
*नाभिक समाज संघटना, राहाता* यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात दोन प्रमुख कार्यक्रम होणार आहेत.
*मंगळवार दि. ०८.०९.२०२६ रोजी श्री संत सेना महाराज मंदिर, न्हावी गल्ली , राहाता येथे कार्यक्रमाची रूपरेषा अशी:*
*१) दैनिक धार्मिक कार्यक्रम:*
– पहाटे ५.०० ते ६.०० – महाराजांच्या मूर्तीचा महाभिषेक
– सकाळी ६.०० ते ७.०० – सत्यनारायण महापूजा
– सकाळी ८.०० ते १०.०० – राहाता शहरातून भव्य मिरवणूक व प्रवचन
– सकाळी १०.३० ते १२.०० – महाप्रसाद
*२) समाज गौरव पुरस्कार व जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा:*

याच दिवशी *सकाळी ११.०० वाजता* राहाता शहरातील नाभिक समाजातील *२० सन्माननीय जेष्ठ नागरिकांचा* समाज गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात येणार आहे.
*प्रवचनकार:* ह.भ.प. हर्षद महाराज भागवत (लोणीकर) यांचे जाहीर कीर्तन व प्रवचन होणार आहे.
या निमित्त सर्व नाभिक बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून, तसेच राहाता शहर व परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक *श्री. दशरथ तुपे , अध्यक्ष. श्री. संदीप तुपे , उपाध्यक्ष .श्री. विरेंद्र बिडवे , सचिव .श्री. प्रवीण तुपे* व समस्त नाभिक समाज संघटना, राहाता यांनी केले आहे.
*- शिर्डी आवाज न्यूज, राहाता*


















