*राहाता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्था राहाता ची वार्षिक सभा उत्साहात; चेअरमन भाऊसाहेब चौधरी यांचा विशेष गौरव*

*राहाता (प्रतिनिधी) -* राहाता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्था राहाता ची सन २०२६-२७ ची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात संपन्न झाली.
यावेळी व्हा. चेअरमन डॉ. संतोष मैड यांनी चेअरमन श्री. भाऊसाहेब चौधरी पाटील यांची मेहनत, त्यांना संचालक मंडळाची मिळालेली भक्कम साथ आणि कर्मचारी वर्गाच्या मेहनतीचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, *चेअरमन श्री. भाऊसाहेब चौधरी पाटील यांना काही दिवसांपूर्वीच राज्यस्तरीय इच्छापूर्ती गौरव ‘अर्थ रत्न पुरस्कार २०२६’ मिळाल्याबद्दल* डॉ. संतोष मैड आणि सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद व उपस्थित पाहुण्यांतर्फे त्यांचा विशेष सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

संस्थेची प्रगती, ठेवीतील चौपट वाढ आणि नावारूपाला येण्यामागे चौधरी साहेबांचे नेतृत्व आणि सर्वांचे सहकार्य कारणीभूत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या सभेत पतसंस्थेच्या तरतुदी, वार्षिक उलाढाल, पुढील कार्याचा आढावा, नवनवीन योजना, वार्षिक खर्च, एकूण नफा यावर सखोल चर्चा झाली.
चेअरमन भाऊसाहेब चौधरी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बँकेच्या यशात मिळालेली संचालक मंडळाची साथ,कर्मचारी वर्गाची मदत,सर्व खातेदार ,सभासद,कर्जदार यांचे आभार मानून सर्वांनी अशीच साथ पुढेही द्यावी असे सांगितले.
यावेळी चेअरमन भाऊसाहेब चौधरी, व्हा. चेअरमन डॉ. संतोष मैड, संचालक देविदास सोनटक्के, सतीशशेठ खांबेकर, राजुभाई पठाण (पत्रकार) ,संजय देवकर,देवराम गाडेकर,संदीप तुपे,मनीषा गोर्डे,बेबिताई सदाफळ,सदाशिव बोठे उर्मिला निकाळे,विलासराव साठे,रावसाहेब भागवत,पुरूषोत्तम गुंजाळ,रमेश निकाळे सर,रवींद्र वैजापूरकर,साइगणेश गव्हाणे,अशरफ शेख आदी उपस्थित होते.





















