राहाता गटनेतेपदी मुन्नाभाई शहा यांची निवड, डॉ. सुजय विखे पाटलांचा मास्टर स्ट्रोक
जि.प. आणि पं. स.साठी सर्व-सामान्य कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येणार
राहाता-(राजूभाई पठाण)
राहाता शिर्डीची नगर परिषद निवडणूका एकहाती जिंकत डॉ सुजय विखे पाटील यांनी आपला करिष्मा दाखवून दिला, ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी गटनेते पदाची संधी देखील
सामान्य कार्यकर्त्यांना देऊन मास्टर स्ट्रोक खेळला आहे, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य आले आहे, इथून मागे पाहिले तर राजकीय व्यवसाईक सह सर्वच क्षेत्रात त्याच त्याच चेहऱ्यांना व त्याच त्याच कुटुंबानां संधी मिळत होती असे बोलले जात असे, परंतु काही दिवसापासून डॉ सुजय विखे पाटील यांची कार्यशैली पाहाता सामान्य कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही, एक काळ असा होता की जनाधार नसलेले फक्त चमकोगिरी करून आणि राजकीय व व्यवसाईक हित साध्य करण्यापूरते गर्दी करणारा कार्यकर्ता विरुद्ध कुठल्याही पदाची सत्काराची अपेक्षा न ठेवता तळमळीने विखे पाटील परिवाराचे जनसेवेचे कार्य तळागाळातील मतदारांपर्यंत पोहचवणारा सर्व सामान्य अभ्यासू कार्यकर्ता असे दोन प्रकार असल्याचे सामान्य जनतेकडून बोलले जात होते, डॉ सुजय विखे पाटील यांनी ही दरी कमी करण्याचे आणि प्रत्येकाला
न्याय देण्याची भूमिका घेतली आहे, सध्या डॉ सुजय विखे पाटीलांचे सर्वच राजकीय डाव निर्णायक ठरत आहेत यामुळे सद्य स्थितीला अहिल्यानगर जिल्ह्यात डॉ सुजय विखे पाटील “धुरंधर” ठरले आहेत,

शिर्डी आणि राहात्या सारख्या शहरात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि ईतर नगरसेवक पदाचे उमेदवार देऊन त्यांच्यामागे पुर्ण ताकत उभी केली आणि एकहाती विजय मिळवला, सोबतच राहात्यात नगरसेवक मुन्नाभाई शहा या अल्पसंख्यांक आणिनिष्ठावंत कार्यकर्त्याला गटनेते पद देऊन राजकारनातील सर्व धर्म सर्व जाती समभाव जपण्याचे काम केले आहे, शिवाय विरोधकांना देखील अचंबित करून खऱ्या अर्थाने मास्टर स्ट्रोक खेळला आहे, यावरून असे लक्षात येते की ग्रामीण भागात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे ऐकनिष्ठ काम करत असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.




















