Homeताज्या बातम्यानिळवंडे ला पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव द्या:—श्री भाऊसाहेब माधवराव...

निळवंडे ला पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव द्या:—श्री भाऊसाहेब माधवराव चौधरी पाटील चेअरमन, राहाता पिपल्स सहकारी पतसंस्था, राहाता.

‘निळवंडे’ला पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखेंचे नाव द्या : भाऊसाहेब चौधरी

Screenshot

जिरायत भागातील शेतकरी प्रगतशील व्हावा, समृद्ध बनावा, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, त्यांचे आयुष्य व भविष्य प्रगतीच्या माध्यमातून उज्वल व्हावे त्यासाठी निळवंडे धरण निर्मिती व घाटमाथ्यावरील पश्चिमेला वाहून समुद्राला मिळणारे पाणी नद्या जोड प्रकल्पाद्वारे पूर्वेला वळविणे ही दोन स्वप्न पाहणारे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, विखे पाटील परिवाराचे यादृष्टीने अनमोल योगदान आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी निळवंडे धरण पूर्ण करून जिरायत भागातील शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती केली व पश्चिमेचे पाणी पूर्वेस येणारा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात उत्कर्ष व उत्क्रांती निर्माण करणाऱ्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचा व विखे पाटील परिवाराचा पाणी प्रश्नावरील संघर्ष व त्यासाठीचा त्याग, समर्पण आणि योगदान विचारात घेता शासनाने निळवंडे धरणाला ‘पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील निळवंडे डॅम’ असे नामकरण करून त्यांचा गौरव करुन पाट पाण्याच्या संघर्षाच्या इतिहासाला सुवर्ण क्षणांना अविस्मरणीय ठेवावे.

ळवंडे धरणाच्या माध्यमातून जिरायत शेती पाट पाण्याद्वारे ओलिताखाली अर्थात सिंचनाखाली यावी, त्याद्वारे आर्थिक उन्नती व प्रगती होऊन शेतकरी बांधव समृद्ध व्हावा, परिसराचा व गावांचा विकास साधला जावा तसेच घाटमाथ्यावरील पश्चिमेला वाहून जाणारे पाणी नद्याजोड प्रकल्पाद्वारे पूर्वेला वळवून पाण्याची तुट भरून काढण्यासाठी राजकीय संघर्ष करून निळवंडे धरण पूर्ती व कालव्यांची पोट चाऱ्यांची कामे पूर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती करण्यात सिंहाचा वाटा असणारे स्वर्गीय पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील परिवार यांचे अनमोल योगदान आहे. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सात तालुके नाशिक जिल्ह्यातील एक तालुका असे मिळून दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे १८२ गावांना या सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तर एकूण ६८,८७८ हेक्टर (अंदाजे १ लाख ७० हजार एकर) क्षेत्र निळवंडे धरणाच्याद्वारे सिंचनाखाली येणार आहे. पिढ्यानपिढ्या प्रतिक्षेत असणारा व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या या प्रकल्पाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी रोवली आहे. म्हाळादेवी की निळवंडे अशी द्विधा परिस्थिती असताना निळवंडेसाठी आग्रही भूमिका घेऊन निळवंडे धरणाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ विखे पाटील परिवाराने रोवली आहे. पुढे चालून केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपद सांभाळत असताना पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी वेळोवेळी निळवंडेसाठी निधी मिळवण्याकरिता केंद्राकडे मागणी केली व तो मिळवूनही दिला. त्याचप्रमाणे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा निळवंडे धरणाच्या कामासाठी केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी भरीव निधी मिळवला. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यास शासनाला भाग पाडले,

निळवंडे धरणाला अनेकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला वेळप्रसंगी विखे पाटील परिवाराच्या नावाने अपप्रचारही केला परंतु या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून जिरायत भागातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, निळवंडेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर सुमारे १८२ गावांना या सिंचनाचा लाभ मिळाला पाहिजे, त्यातून वा भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे याकरिता मान, अपमान व श्रेय वा सर्व बाबी बाजूला ठेवून निळवंडेच्या पाट पाण्यासाठी मोठा संघर्ष केला. निळवंडे धरण पूर्ण करून कॅनॉलचे काम व चाऱ्या निर्माण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या सर्वांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन करून शेतकऱ्यांच्या जीवनातील हा स्वप्नपूर्तीचा अविस्मरणीय क्षण सुवर्ण अक्षरांनी नोंदवण्याचे

भाग्य विखे पाटील परिवाराने मिळविले आहे. शेतकरी पाणी आणि संघर्ष हे समीकरण

विखे पाटील परिवाराच्या चौथ्या पिढीलाही वाटयाला आले आहे. शेतकऱ्यांना पाणी प्रश्नात जर कोणी निःस्वार्थ, निरपेक्ष भावनेने व प्रामाणिक हेतूने न्याय देणार असेल तर ते फक्त विखे पाटील परिवार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजपर्यंत शेतकरी हिताचे प्रचंड निर्णय घेतले आहेत. ज्या ज्या मंत्रीपदाचा कार्यभार त्यांनी केला त्या त्या खात्याला त्यांनी एक नवा आयाम दिला आहे. पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. स्वगर्गीय पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण दोन स्वप्न होते. त्यातील एक स्वप्न म्हणजे निळवंडे धरण आणि दुसरे स्वप्न म्हणजे घाटमाथ्याचे पश्चिमेला वाहून जाऊन समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेला वळवणे, या दोन स्वप्नापैकी निळवंडे धरणाची स्वप्नपूर्ती झाली आहे तर पश्चिमेला वाहून जाणारे पाणी

नद्या जोड प्रकल्पाद्वारे पूर्वेस वळवण्याचे स्वप्न लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे. फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरते नव्हे तर अहिल्यानगर जिल्हाच पाणीदार झाला पाहिजे, शेतकरी सुखी समाधानी व समृद्ध बनला पाहिजे यासाठी ध्यास घेऊन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय दादा विखे पाटील कार्य करत आहे. दक्षिणेतील कुकडीचा प्रश्न, साकळ्ळाई योजना, मुळा वांबोरी चारी तसेच संगमनेरची भोजापूर चारी यांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. त्याचबरोबर शेकडो वर्षांनंतर गोदावरी कालवा नूतनीकरण व रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावून कालव्याची वहन क्षमता वाढवण्याचे काम मंत्री विखे पाटील यांनी मार्गी लावले आहे. गोदावरी कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून सुद्धा पाणी प्रश्न ते सोडवत आहे. पश्चिमेला वाहून जाणारे पाणी पूर्वेला वळवून गोदावरी खोऱ्यात असलेली पाण्याची तूट भरून काढण्याचा दूरदृष्टी विखे पाटील परिवाराकडे आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

 

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सावकारकीच्या पाशातून बळीराजाची सोडवणूक करण्याकरिता सहकारी तत्त्वावरील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे उभारला. त्यानंतर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी शेतकऱ्यांची मुले उच्चशिक्षित बनली पाहिजे. डॉक्टर, इंजिनियर झाली पाहिजे यादृष्टीने प्रवरेत मेडिकल कॉलेज, इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या रोपटयांना वाढविताना

काळजीपूर्वक जपले आणि लोणीत शिक्षणाची पंढरी निर्माण केली. चौथ्या पिढीचे कर्तृत्व आणि नेतृत्व असणारे माजी खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी रिकाम्या हातांना रोजगार, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या न्याय हक्कासाठी आपला लढा चालू ठेवलेला आहे. त्याचबरोबर एमआयडीसीच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांप्रती असलेली विखे पाटील घराण्याची आत्मीयता जपली. आज चौथी पिढी सुद्धा वा मतदारसंघाचा विकास, अहिल्यानगर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी, सर्वसामान्यांचे जीवन सुखी समाधानी व आनंदी ठेवण्याकरता झटत आहे. शिर्डीसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे, औद्योगिक वसाहत, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, शिर्डी देवस्थानचा विकास तसेच कृषी शिक्षण, आरोग्य, पाटबंधारे, सहकार यासह विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण विकास व प्रगती साधण्याचे अविरत कार्य विखे पाटील परिवाराच्या हातून घडत आहे. त्यामुळे शिर्डी मतदारसंघ अर्थात अहिल्यानगर जिल्हा राज्याच्या पटलावर विकासाचे रोल मॉडेल म्हणून उदयास आला आहे.

माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई सुजय दादा विखे पाटील यांनी नागरिकांच्या हितासाठी संघर्षाला व सेवेच्या व्रताला स्वतःचं जीवन समर्पित केले आहे. त्यामुळेच विखे पाटील परिवार फक्त अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्य व देशातील अनेक राजकारण्यासाठी प्रेरणेचा एक महा दीपस्तंभ आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त शब्दरूपी अभिष्टचिंतन करताना विखे पाटील परिवाराला त्यांच्या कार्यकर्तृत्वाला, नेतृत्वाला, दातृत्वाला शतया सलाम शतदा सलाम… साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Australia pacer takes 8/25 as Bangladesh bowled out for 54, lose match by an...

Bangladesh were bowled out for just 54 in their second innings to lose their three-day tour match against a Cricket Australia XI...

US rejects China’s Scarborough Reef measures, backs Philippines in South China Sea dispute

The United States alleged that China was using environmental and legal justifications to advance broader maritime claims across the South China Sea. The...

Jorge Messi: The man who made Messi: 5 unforgettable parenting lessons every Indian parent...

Today, August 8, 2026, the football world is mourning. Lionel Messi's father and longtime agent, Jorge Messi, died at the age of...

After online share fraud, ex-Army man fights frozen accounts battle

Proceeds from mule accounts can land even cybercrime victims in problem Pune: Any proceeds from mule accounts can land cyber fraud victims in...

AFA, Barcelona mourn death of Lionel Messi’s father Jorge Messi

Lionel Messi, Jorge Messi The Argentine Football Association (AFA) on Saturday offered its condolences to Lionel Messi and his family following the death...

Australia pacer takes 8/25 as Bangladesh bowled out for 54, lose match by an...

Bangladesh were bowled out for just 54 in their second innings to lose their three-day tour match against a Cricket Australia XI...

US rejects China’s Scarborough Reef measures, backs Philippines in South China Sea dispute

The United States alleged that China was using environmental and legal justifications to advance broader maritime claims across the South China Sea. The...

Jorge Messi: The man who made Messi: 5 unforgettable parenting lessons every Indian parent...

Today, August 8, 2026, the football world is mourning. Lionel Messi's father and longtime agent, Jorge Messi, died at the age of...

After online share fraud, ex-Army man fights frozen accounts battle

Proceeds from mule accounts can land even cybercrime victims in problem Pune: Any proceeds from mule accounts can land cyber fraud victims in...

AFA, Barcelona mourn death of Lionel Messi’s father Jorge Messi

Lionel Messi, Jorge Messi The Argentine Football Association (AFA) on Saturday offered its condolences to Lionel Messi and his family following the death...
error: Content is protected !!