Homeताज्या बातम्याझाडांचा दहावा वाढदिवस उत्साहात साजरा .....डॉ श्री बापुसाहेब पानगव्हाणे ( अध्यक्ष साई...

झाडांचा दहावा वाढदिवस उत्साहात साजरा …..डॉ श्री बापुसाहेब पानगव्हाणे ( अध्यक्ष साई योगा मंडळ राहाता )

झाडांचा दहावा वाढदिवस उत्साहात साजरा …..
राहाता येथील पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या साईयोग फाउंडेशन द्वारे झाडांचा दहावा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.साईयोग फाउंडेशन द्वारे गेली दहा वर्ष १ जुलै ते ७ जुलै हा वृक्षारोपण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो.तसेच वर्षभर प्रत्येक रविवारी अथवा वाढदिवस किंवा दशक्रिया विधी निमित्त राहाता शहर व परिसरात विविध देशी झाडे लावण्यात आली.ह्या झाडांचे वर्षभर संवर्धन करण्यात आले.

रविवारी भल्या पहाटे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील झाडांना फेटे,पुष्पहार व रंगीबेरंगी फुग्यांनी सजविण्यात आले होते.तसेच आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.महिला सदस्यांचा हस्ते औक्षण करून पूजन करण्यात आले.तसेच बालगोपालांच्या हस्ते झाडाच्या आकाराचा व हिरव्या रंगाचा केक कापण्यात आला.साईयोग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या स्नुषा सौ. खुशी व चिरंजीव पियूष पानगव्हाणे या नवदाम्पत्य च्या हस्ते वृक्षारोपण करून भावी वैवाहिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी राहाता नगरपालिकेचे अध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर, उपाध्यक्ष डॉ विजय सदाफळ,सन्माननीय नगरसेवक, डॉ पी जी गुंजाळ, साईश्रद्धा फाऊंडेशनचे सचिन घोडेकर, ग्राजुएट चहाचे संस्थापक युवा उद्योजक निलेश जाधव,राहाता सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन विलास सदाफळ, शारदा संकुलाचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे,वसुंधरा फाउंडेशन दहेगाव चे संस्थापक सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे, दहेगाव च्या सरपंच पूनमताई डांगे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सर्व मान्यवरांचा फेटा बांधून साईशाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वृक्षसंवर्धनाचे अनमोल कार्यासाठी नगरपालिकेचे ड्रायवर प्रभाकर नावकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
साईयोग फाउंडेशन चे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले. नगरसेवक दशरथ तुपे यांनी प्रास्ताविक करत साईयोग फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडला. नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले पर्यावरण रक्षणार्थ निःस्वार्थ भावनेने मानवाला प्राणवायू, फळ,फुले,सावली देणाऱ्या वृक्षांचा वाढदिवस तोही निःस्वार्थ भावनेने साजरा करणे हे साईयोग फाउंडेशनचे कार्य महान आहे.राहाता शहरातील हरित क्रांतीचे सर्व श्रेय हे साईयोग फाउंडेशन ला जाते. यापुढे नगरपालिके द्वारे खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्याचे आश्वासन देत शुभेच्छा दिल्या.तसेच डॉ पी जी गुंजाळ,कैलासबापू सदाफळ,रमेश शिंदे यांनीही फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.बालशिव व्याख्याता धनराज शेटे म्हणाला संक्रांती निमित्त महिला वाटी,कंगवा,आरसा वाण म्हणून देत असतात.ज्याचा फारसा उपयोग होत नाही.त्याऐवजी एक रोप देऊन त्याचे संवर्धन केले तर पर्यावरणाचे महान कार्य होईल. डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी फाउंडेशन द्वारे होणाऱ्या कार्याचे सर्व श्रेय आपल्या सहकाऱ्यांना देत सर्वांचे आभार मानले.

शेवटी जेष्ठ सदस्य बबलू फटांगरे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, उपाध्यक्ष डॉ विजय सदाफळ, डॉ पी जी गुंजाळ,नामदार विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक मधुकर चौधरी,कैलास सदाफळ, योगगुरू सुरेश भिंगारदिवे, पत्रकार राजुभाई पठाण, सचिन घोडेकर, निलेश जाधव, विलास सदाफळ, रमेश शिंदे, मेघशाम डांगे, पूनमताई डांगे,अनुराधाताई तुपे, नगरसेवक मुन्नाभाई शाह, नितीन गाडेकर, प्रवीण रुणवाल, अजय आग्रे, दशरथ तुपे, संजय सदाफळ, म्हसु पाटील सदाफळ, अजय सदाफळ, सुनिल सदाफळ, सर्जेराव मते, अरुण मोकळ, प्रवीण खंडिझोड, डॉ अंजली पानगव्हाणे, सुष्मिता चव्हाण, नीलम चेणुके, राणी धनवटे, भारती हुसळे, नामदेव गाडेकर, पंढरीनाथ काकडे, बाळासाहेब निर्मळ, भाऊसाहेब भगत, वैभव गोसावी, नितीन घायाळ, भानुदास जायभाय, अशोक शिंदे, राजेंद्र गुंजाळ, ॲड गोरखनाथ दंडवते, ॲड दिगंबर धनवटे, भरत दावंगे, बाळासाहेब गाडेकर ,बबलू फटांगरे, संदीप डांगे, मनोज पिपाडा, मोहन तांबे, संजय बाबर, रविंद्र धस, परमेश चव्हाण, दिपक गाडेकर, भाऊसाहेब बनकर,विलास वाळेकर, रंगनाथ सदाफळ, विठ्ठल निर्मळ, संजय वाघमारे, सिताराम बावके, उमेश लुटे, अनिल सातव, कैलास चेणुके, दिपक दंडवते, पांडुरंग गायकवाड, भागवत आरणे, नारायण गाडेकर, सुभाष दंडवते, राजेंद्र बांगर, मेजर संदीप जेजुरकर, प्रणव लावर, ऋषी आहेर, शिवाजी पोटे, संतोष बावके, पियूष पानगव्हाणे, अशोक साठे, अर्जुन चव्हाण, सार्थक तुपे, धनराज शेटे, विराज चेणुके आदी मान्यवर उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Prince William and Harry won’t inherit Princess Diana’s childhood home: Here’s who gets Althorp

Prince William and Prince Harry won’t inherit Princess Diana’s childhood home, where she is buried: Here’s who willPrincess Diana’s childhood home is also where...

Rutuja to partner Yuki; Indian men face Korean hurdle, again, in Asian Games tennis

Pune: Rutuja Bhosale, the mixed doubles gold medallist from the past edition, will partner Yuki Bhambri while 2018 singles bronze medallist Ankita...

India impress against Panama in 1-1 draw as Blue Tigers stand firm against World...

India hold World Cup-bound Panama to 1-1 draw in major test for Khalid Jamil’s side/ Image: X India had to surrender a first-half...

In a first, waste plastic mixed with bitumen in pilot test section of NH-44

NEW DELHI: In a first for the road sector, govt has used waste plastic as a wet mix with bitumen to lay...

‘Mujhe bahut pareshaan kiya jaa raha tha’: Employee says workplace complaints backfired – ‘I...

'Mujhe bahut pareshaan kiya jaa raha tha': Employee says workplace complaints backfired - ‘I was tortured; I complained, yet I had to resign’...

error: Content is protected !!