*शिर्डी आवाज न्यूज – राहाता*
*खानकाहे फैजे मशाएख, राहाता येथे माहाना इस्लाही मजलिसचे आयोजन, 27 सप्टेंबरला मोठ्या उलेमांची उपस्थिती*
*राहाता (जि. अहिल्यानगर):* खानकाहे फैजे मशाएख, राहाता जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने *माहाना इस्लाही मजलिस* चे आयोजन करण्यात आले आहे.

*तारीख:* 27 सप्टेंबर 2026, बरोज इतवार (रविवार)
*वेळ:* बाद नमाजे असर ता इशा (असरच्या नमाजपासून इशा पर्यंत)
*बमुकाम:* बडी मस्जिद, दारुल उलूम उस्मानिया, राहाता
*या मजलिसमध्ये:*
*जेरे सदारत (अध्यक्षता):*
हजरत मौलाना मो. अय्युब सा. नदवी (नाजिम जामिया एजाजुल कुरआन, संगमनेर)
*मुकर्रिरे खुसूसी (प्रमुख वक्ते):*
हजरत मौलाना मुफ्ती हामिद जफर सा. रहमानी (नाजिमे आला व शैखुल हदीस, महदे मिल्लत, मालेगाव)
*मेहमानाने खुसूसी (विशेष पाहुणे):*
1) हजरत मौलाना मो. युसुफ सा. मिल्ली नदवी
2) हजरत मौलाना मुफ्ती रिजवानुल हसन सा. मजाहेरी
3) हजरत मौलाना हाफिज मुख्तार सा. मिल्ली
राहाता, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर परिसरातील सर्व भाविकांना, मुस्लिम बांधवांना या इस्लाही मजलिसमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खानकाहे फैजे मशाएखच्या वतीने करण्यात आले आहे.
*शिर्डी आवाज न्यूज – संपादक राजुभाई पठाण*




















