इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा!
चैतन्य पाटील सेंट्रल जेलमध्ये रवाना; मितांशू प्रेमानी फरार
शिर्डी | प्रतिनिधी
इन्स्टाग्रामवरून सुरू झालेला संपर्क पुढे फोन, व्हॉट्सॲप संदेश आणि धमक्यांपर्यंत पोहोचत एका तरुणीला मानसिक त्रास दिल्याच्या प्रकरणात चैतन्य अरुण पाटील (रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) आणि मितांशू हरीश उर्फ बब्बलू प्रेमानी यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चैतन्य पाटील याला अटक केली आहे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला सेंट्रल जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, दुसरा आरोपी मितांशू प्रेमानी अद्याप फरार असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, जुलै २०२४ पासून चैतन्य पाटील याचा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संबंधित तरुणीशी संपर्क होता. त्यानंतर मोबाईल कॉल, व्हॉट्सॲप मेसेज आणि इतर माध्यमातून वारंवार संपर्क साधण्यात आला. या प्रकारातून संबंधित तरुणीला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, “तुझे करिअर खराब करेल, आयुष्य खराब करेल” अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्या वारंवार फोन व मेसेज करून मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणात चैतन्य पाटीलचा मित्र मितांशू हरीश उर्फ बब्बलू प्रेमानी याचाही सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद असून, त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर मितांशू प्रेमानी फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.१८ वाजता शिर्डी पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०८६७/२०२६ दाखल करण्यात आला. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७८, ३५२, ३(५) तसेच POCSO कायदा २०१२ मधील कलम १२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी चैतन्य पाटील याला अटक करून राहता न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चैतन्य पाटील याची सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
दुसरा आरोपी मितांशू हरीश उर्फ बब्बलू प्रेमानी फरार असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी शिर्डी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी शिर्डी आणि शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली PSI आकांक्षा जाधव करीत आहेत.
एक सेंट्रल जेलमध्ये, दुसऱ्याचा शोध सुरू!
चैतन्य अरुण पाटील सेंट्रल जेलमध्ये रवाना; मितांशू प्रेमानी फरार
शिर्डी पोलिसांनी चैतन्य अरुण पाटील याला अटक करून राहता न्यायालयात हजर केले होते. एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्याची सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्ह्यातील दुसरा आरोपी मितांशू हरीश उर्फ बब्बलू प्रेमानी हा फरार असून, त्याला अटक करण्यासाठी शिर्डी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.




















