*इंजेक्शनची नशा करून हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार जेरबंद, शिर्डी पोलिसांची रात्री 12.30 वाजता धडाकेबाज कारवाई*

*शिर्डी (दि. २१):* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात मोठा गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयितरित्या वावरणाऱ्या टोळीला शिर्डी पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दि. 19/09/2026 रोजी रात्री 12.30 वाजता शिर्डी गावात कालिकानगर ते बन रोड, राजगुरुनगर येथे काही सराईत गुन्हेगार दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांना मिळाली होती.
पथकाने तात्काळ रवाना होऊन कारवाई केली असता 2 आरोपी जागेवर मिळून आले तर 3 पळून गेले.
*जेरबंद आरोपी:*
1) सावड्या उर्फ साईनाथ गोरक्षनाथ पाचरणे, रा. राजगुरुनगर, शिर्डी
2) कुणाल प्रकाश मुदलियार, रा. पानमळा, शिर्डी
*फरार आरोपी:* प्रथमेश बबन घोरपडे, सौरव किरण गायकवाड, आणि मुसा.
*जप्त मुद्देमाल – ₹50,425/-*
1) 21 सेमी लांबीचा धारदार चाकू (काळी मूठ)
2) मॅरफेटमिन सल्फेट इंजेक्शन टरमाईन 30 ML बाटली (नशेसाठी वापर)
3) 6 रिकाम्या सिरिंज
4) हिरो स्प्लेंडर मोटरसायकल
याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 826/2026 BNS कलम 310(4), 310(5), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास PSI प्रदिप बो-हाडे करीत आहेत.

*बातमी क्र. 2 – 5 गुन्हे उघडकीस*
*जबरी चोरी व चैन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद, 3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त – शिर्डी पोलिसांची दुसरी मोठी कारवाई*
*शिर्डी:* गणपती उत्सवात रूट मार्च दरम्यानच शिर्डी पोलिसांच्या तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे.
दि. 19/09/2026 रोजी सायंकाळी 8 वाजता बन्सी हॉटेल जवळ 2 इसम मोटरसायकलवर संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार सतपाल शिंदे यांनी दिली. पथकाने पाठलाग करून एकास पकडले.
*आरोपी:*
1) प्रेम सुधाकर पवार (27), रा. टाकळीगाव, नाशिक
2) विनोद गंगाराम पवार, रा. राजीवनगर, नाशिक (पळून गेलेला)
चौकशीत त्यांनी कबुली दिली की, शिर्डी शहर व परिसरात त्यांनी अनेक चैन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचे गुन्हे केले आहेत.
*त्यांनी सांगितलेले गुन्हे:*
– दि. 02/07/2026 – राजगवाडा देशमुख येथे चैन स्नॅचिंग
– दि. 26/08/2026 – श्रीसाईबाबा मंदीराजवळ चैन स्नॅचिंग
– दि. 05/09/2026 – पिंपळवाडी रोड – अल्टो कारमधील सिम कार्ड चोरी + मोबाईल चोरी
– दि. 25/04/2026 – साईबाबा हॉस्पिटल येथून स्प्लेंडर चोरी
– दि. 19/05/2026 – शाईन मोटरसायकल चोरी
या कबुलीवरून शिर्डी पोलीस स्टेशनचे 5 गुन्हे उघडकीस आले आहेत – गु.र.नं. 793/2026, 759/2026, 591/2024, 414/2026, 287/2026.
*जप्त मुद्देमाल – ₹3,58,000/-*
– 1,40,000/- रु. किमतीची 20 ग्रॅम सोन्याची लगड
– 1,08,000/- रु. 18 ग्रॅम सोन्याची लगड
– 35,000/- रु. 5 ग्रॅम सोन्याची लगड
– 15,000/- रु. 2.5 ग्रॅम सोन्याची लगड
– 30,000/- रु. होंडा कंपनी साईन मो.सा. MH 17 BI 3412
– 30,000/- रु. हिरो स्प्लेंडर मो.सा.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी विनोद पवार याच्यावर नाशिक शहर, ग्रामीण व अहिल्यानगर जिल्ह्यात *20 गंभीर गुन्हे* दाखल आहेत, तर प्रेम पवार वर 9 गुन्हे दाखल आहेत. भद्रकाली पोलीस स्टेशनला त्याच्यावर MCOCA व NDPS चेही गुन्हे आहेत.
*दोन्ही कारवाया* मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी श्री. अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली PI रणजीत गलांडे, PSI कल्याणकुमार चंद्राण, सागर काळे, प्रदीप बोराडे, MPSE आकांक्षा जाधव व पथकाने केल्या आहेत.




















