कसाऱ्यातील ‘त्या’ पाड्यांचा वीजपुरवठा सुरळीत
। कसारा जंगलनिवासी -वस्त्या म्हणून ओळखल्या -जाणाऱ्या राड्याचापाडा आणि – वारलीपाडा या दोन वस्त्यांचा १५ -दिवस खंडित झालेला वीजपुरवठा – अखेर सुरळीत करण्यात आला. – खंडित वीजपुरवठ्यावर भाजप -कसारा शहर शाखेचे अध्यक्ष विनायक सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत महावितरणला – आंदोलनाचा इशारा दिला होता. . यामुळे महावितरण -विभागाला जाग आणली. तत्काळ -दखल घेत महावितरण कंपनीने -नवीन विद्युत रोहित्र बसवून -शनिवारी वीजपुरवठा सुरळीत – केला.
वीज वितरण कंपनीच्या – दुर्लक्षामुळे राड्याचा पाडा आणि – वारलीपाडा वस्त्यांमधील लोक – गेली १५ दिवस आपलं दैनंदिन – जीवन अंधारात कंठत होते . यामुळे सर्प, विंचू आणि वन्यप्राण्यांच्या
धोक्यासह इतर समस्यांनाही सामोरे जावे लागत होते. ही समस्या पाहून पाहून भाजप शहराध्यक्ष विनायक सावंत यांनी शहापूर महावितरण उपविभागाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. याचा धसका घेत वरिष्ठ स्तरावर हालचालींना वेग देऊन महावितरण कल्याण ग्रामीण विभागाने तत्काळ नवीन विद्युत रोहित्र उपलब्ध करून त्या वस्त्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला.
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि शहापूर तालुकाध्यक्ष भास्कर जाधव समस्येची दखल घेऊन महावितरण विभागाच्या अभियंत्यांना सूचना करत पाठपुरावा केला.





















