


श्री साईबाबांच्या पावनभूमीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राहता तालुकाध्यक्ष व साई संगम सेवाभावी संस्था शिर्डी तसेच आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू तसेच डोळ्यांवरील शस्त्रक्रिया व सर्व उपचार याचे मोफत शिबिराचे दिनांक २४/८/२०२५ रोजी करण्यात आले या शिबिरासाठी शिर्डी व परिसरातील गरजू रुग्णांनी सकाळपासूनच रांगा लावत डोळ्यांची तपासणी करून घेतली याप्रसंगी पत्रकार राजूभाई पठाण व पत्रकार प्रशांत अग्रवाल आणि मान्यवरांनी श्री साईबाबा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करत पुष्पहार अर्पण केला, दीपप्रज्वलन केले व संदीप सोनवणे यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या शिबिरासाठी शिर्डी सह पंचक्रोशीतील गरजू रुग्णांनी हजेरी लावत आयोजक संदीप सोनवणे यांच्या साई सेवेचे कौतुक करत आभार मानले तर संदीप सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की ही श्री साईबाबांची सेवा असून बाबांनी दिलेल्या रुग्ण सेवेच्या संदेशाला पुढे घेऊन जाण्याचे भाग्य आम्हाला प्राप्त झाले तसेच गोरगरिब गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला मोठे समाधान लाभते ही सेवा अशीच अविरत बाबा आमच्याकडून करवून घेतील अशी अपेक्षा संदीप सोनवणे यांनी व्यक्त केली




















