राहाता शहरातील चितळीरोड लगत साई विठ्ठला लॉन्सजवळील सदाफळ कॉम्प्लेक्स येथे आज ‘कृषी संजीवनी कृषी सेवा केंद्र’ चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले…यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या…
परवेज पठाण, सलीम शेख आणि तौफिक कुरेशी या तिघा मित्रांनी एकत्र येत हे सेवा केंद्र सुरू केले असून, यामार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक किटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके, बी-बियाणे , शेती पंप आणि खते वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यावेळी परवेज पठाण म्हणाले की, “या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन आणि सल्ला दिला जाणार असून आधुनिक शेतीसाठी उपयुक्त माहिती पोहोचवली जाईल..
यावेळी उद्योजक,फ्रूट व्यवसायातील राहत्याचे अग्रेसर व्यापारी व शेतकरी मित्र हाजी मुन्नाभाई (शफिक)शहा,यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की परिसरातील शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन,सल्ला व शेतिउत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गरजेच्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळून आधुनिक शेतीसाठी आधार ठरणार आहे.यावेळी मौलाना हाजी अब्दुल रऊफ साहब,अन्सारभाई पठाण,पत्रकार दिलीप चोखर,समीरभाई बेग,राजूभाई पठाण,जाविदभाई सय्यद,शेरअली सय्यद,सुन्ना भाई शेख,विजय चौधरी,आबा चौधरी,इलियास तांबोळी,गणी शेख,मतीन शेख,मच्छिंद्र चौधरी,शंकर नाना चौधरी,बारीभाई शेख,हाफिज बशीर भाई साहब,महेमूद शेख,हाफिज कुरेशी,आणासाहेब चौधरी ,शैलेश वाघ,हाफिज नदीम शेख,श्रीधर कोलते,विष्णुपंत लहारे(गणेश कारखाना संचालक)शिवाजीराव साबदे (जळगाव सरपंच)हाफिज सिद्दीक तांबोळी,अनिस भाई कुरेशी,राजेंद्र जपे,न्यानेश्वर उंडे,जावेद शेख,बच्चु चौधरी,रायकिसन रकटे,इक्बाल कादरी,पोपटराव कोल्हे इतर मान्यवरांसह सर्व नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















