साईबाबा संस्थान प्रकाशन व पुस्तके विभागात विविध भाषांमधील साई सतचरित्र ग्रंथ शिल्लक नाहीत गेली सहा महिने पासून श्री साई सच्चरित्र व साईबाबा विषयीचे इतर साहित्य खरेदी करण्यास जाणाऱ्या साई भक्तांना आपल्या मातृभाषेतील अथवा आपल्याला हवे असलेल्या भाषेतील ग्रंथ शिल्लक नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे साईबाबा संस्थान प्रकाशन विभागाचा हा कारभार म्हणजे साई भक्तांचा मनस्ताप वाढविणारा व त्यांच्या भावनांशी खेळणार आहे प्रकाशन विभागाच्या या भोंगळ कारभारांची चौकशी करून दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे परप्रांतीय साई भक्तांना आपल्या भाषेतील साई सच्चरित्र ग्रंथ मिळत नसल्याने संस्थान प्रकाशन विभाग व पुस्तके विक्री केंद्र साई भक्तांच्या दृष्टीने असून अडचण नसून खोळबा अशा स्वरूपाची बनली आहे श्रद्धा समोरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक येत असतात दर्शनानंतर घरी परतताना भाविक साईबाबा विषयीचे विविध भाषेतील श्री साई सतचरीत्र ग्रंथ व इतर लिखित पुस्तके साहित्य संस्थांच्या प्रकाशन विभाग अर्थात पुस्तक खरेदी विक्री केंद्रावरून खरेदी करतात मात्र गेली काही दिवसांपासून ओडिसा तेलगू इंग्रजी यासह इतर काही भाषेतील सच्चरित्र ग्रंथ शिल्लक नसल्याचे समजते भाविक खरेदी करण्यासाठी गेले असता सध्या शिल्लक नाही असे उत्तर भाविकांना ऐकण्याची वेळ येते याबाबत स्थानिकांनी चौकशी केल्यानंतर आम्हाला समितीची परवानगी घ्यावी लागते त्यानंतर खरेदी होते मागणी नोंदवलेली आहे अजून ग्रंथ आले नाहीत असे थातूरमातूर उत्तर देऊन भक्तांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो ही बाब साईबाबा संस्थानच्या दृष्टीने अतिशय अयोग्य आहे साई सतचरीत्र ग्रंथ भाविकांच्या दृष्टीने खूप पवित्र असा ग्रंथ असून अनेक भाविक आपल्या घरी त्याचे वाचन करतात त्यातून साईबाबांच्या कार्याची अनुभूती घेतात प्रचार व प्रसाराच्या दृष्टीने तसेच पारायणाकरिता ही ग्रंथसंपदा खूप महत्त्वाची आहे परंतु साईबाबा संस्थानच्या प्रकाशन व पुस्तक विक्री केंद्राकडे अनेक भाषेतील ग्रंथ शिल्लक नसल्याचे समजते त्यामुळे प्रकाशन विभागाचा हा भोंगळ कारभार कधी थांबणार असा सवाल आता साईभक्तांमधून उपस्थित केला जात आहे याबाबत कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर ग्रंथ उपलब्ध करून द्यावे अशी साई भक्तांकडून होत आहे




















