Homeताज्या बातम्याशिर्डीत भाविकांची गर्दी घटल्याने अर्थकारणाला फटका,साई संस्थानने कुंभमेळ्यापूर्वी नियोजन करावे—गोपीनाथ गोंदकर

शिर्डीत भाविकांची गर्दी घटल्याने अर्थकारणाला फटका,साई संस्थानने कुंभमेळ्यापूर्वी नियोजन करावे—गोपीनाथ गोंदकर

*शिर्डीत भाविकांची गर्दी घटल्याने अर्थकारणाला फटका, साई संस्थानने कुंभमेळ्यापूर्वी नियोजन करावे – गोपिनाथ गोंदकर*

—

*शिर्डी || शिर्डी आवाज न्यूज LIVE*

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांची गर्दी मंदावल्याने येथील हॉटेल, लॉजिंग व्यवसायासह लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम होत आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असलेला हॉटेल व्यवसाय अडचणीत आला असून, परिसरातील गावांच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसत आहे.

या पार्श्वभूमीवर शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष *गोपिनाथ गोंदकर* यांनी साईबाबा संस्थान प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

गोंदकर म्हणाले, “भाविकांची घटती संख्या हा शिर्डीच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी *गोरक्ष गाडीलकर* आणि प्रशासन पादुका दौऱ्यात मग्न आहे.”

*गोंदकर यांच्या प्रमुख मागण्या:*

*1. पादुका दौरा थांबवा, शिर्डीकडे भाविकांना आकर्षित करा:*
देशाच्या विविध भागांत पादुका दर्शनाची व्यवस्था केली जात असेल, तर भाविकांना प्रत्यक्ष शिर्डीत येण्याची गरज कितपत राहील? पादुका दौऱ्यापेक्षा शिर्डीत भाविकांची संख्या वाढवणे आणि सुविधांमध्ये सुधारणा करणे याला प्राधान्य द्यावे.

*2. कुंभमेळ्यापूर्वी मास्टर प्लॅन:*
श्री साईबाबा संस्थानने पुढाकार घेऊन शिर्डी नगरपरिषदेला विश्वासात घेऊन आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अगोदर योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक भाषेत साईबाबांचा संदेश पोहोचवावा.

*3. धार्मिक पर्यटन सर्किट:*
शिर्डीला केंद्रस्थानी ठेवून घृष्णेश्वर, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंग क्षेत्रांचा समावेश असलेला धार्मिक पर्यटन विकास मार्ग तयार करावा.

*4. शिर्डी विमानतळाचा विस्तार:*
गोवा, जयपूर, डेहराडून, लखनौ, केरळ, पुद्दुचेरी तसेच नेपाळ, दुबई, सिंगापूरसाठी विमानसेवा सुरू करावी. पुणे, मुंबई, नाशिक प्रमाणे तिकीट सवलत द्यावी.

*5. लेंडीबागेत पादुका दर्शन:*
देशभरात पादुका नेण्यापेक्षा उत्सव काळात साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लेंडीबागेतच पादुका दर्शनाची व्यवस्था करावी, जेणेकरून भाविक शिर्डीतच येतील.

साईबाबांनी जगाला दिलेला ‘श्रद्धा आणि सबुरी’ तसेच ‘सबका मालिक एक’ हा संदेश शिर्डीची खरी ओळख आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शिर्डीच्या नियोजनबद्ध विकासासाठी आणि सक्षम CEO नेमण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी गोंदकर यांनी केली.

Screenshot
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

College student works as Blinkit delivery executive for 6.5 hours, reveals how much he...

College student works as Blinkit delivery executive for 6.5 hours, reveals how much he earned after 19 orders Part-time jobs can offer students...

Shetti launches agitation to prevent sugar factories from starting crushing season; NFCSF chief Patil...

Swabhimani Shetkari Sanghatana president Raju Shetti Pune/Kolhapur: Swabhimani Shetkari Sanghatana president Raju Shetti on Thursday intensified his agitation for higher sugar and ethanol...

Sports Ministry revises funding rules for federations, mandates advance selection policies

Union sports minister Mansukh Mandaviya NEW DELHI: National Sports Federations (NSFs) will have to publish athlete and coach selection policies well in advance...

‘Police can break bones, not satyagraha’: Rahul Gandhi alleges Delhi Police refused to file...

File photo: Lok Sabha LoP Rahul Gandhi NEW DELHI: Leader of the opposition in the Lok Sabha Rahul Gandhi on Friday alleged that...

The common cooking mistake to avoid for perfectly golden dosas

You mix the batter, heat the tawa, pour a ladle and wait for a thin, golden, crackly dosa. Instead, you get something pale, floppy...

error: Content is protected !!