Homeआरोग्यश्रद्धा आणि सबुरी चा संदेश जगाला देणाऱ्या साईनगरीत रुग्णसेवेची परंपरा आज ही...

श्रद्धा आणि सबुरी चा संदेश जगाला देणाऱ्या साईनगरीत रुग्णसेवेची परंपरा आज ही अखंडपणे सुरू,मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद—दिपक भाऊ गोंदकर (सभापती)

ब्रेकिंग न्यूज
श्रद्धा आणि सबुरी चा संदेश जगाला देणाऱ्या साईनगरीत रुग्णसेवेची परंपरा आज ही अखंडपणे सुरू,मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद—दिपक भाऊ गोंदकर (सभापती)AI mural inspired by Banksy sparks backlash in Bristol: Artists spot wrong landmarks and a bizarre version of the famous Mild Mild West as debate over AI art growsअहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय-जामखेडच्या डॉ मिसबाह शेख यांचा ऐतिहासिक बहुमान11 tehsils reel, activists seek crop inspectionsSreeshankar, Solomon reach long jump final as Tejaswin slips to third in decathlonTaiwan says US understands defence needs as $14 billion arms package remains on hold*खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय, गोगलगाव ची राहाता तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयाची हॅट्रिक…*—श्री सुनील चोळके सर (क्रीडा शिक्षक )रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचा पदग्रहण सोहळा आज रविवार २७ सप्टेंबर रोजी थाटात संपन्न होणार—डॉ श्री सादेख पठाण (अध्यक्ष)Aneet Padda is unrecognisable in this stunning chocolate brown corseted lookBaramati among eight tehsils in Pune district in state’s list

शिर्डी (प्रतिनिधी) : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगाला देणाऱ्या साईनगरीत रुग्णसेवेची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. याच सेवाभावी परंपरेला पुढे नेत कनकुरी रोडलगत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कै. भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि जगन्नाथ चंद्रभान लुटे परिवार, रुद्रा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात शिर्डी शहरासह परिसरातील अनेक नागरिकांनी सहभागी होत विविध आजारांची तपासणी करून घेतली. आर्थिक परिस्थितीमुळे नियमित आरोग्य तपासणीपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांसाठी हे शिबिर विशेष उपयुक्त ठरले.
शिर्डी नगर परिषदेचे आरोग्य व स्वच्छता सभापती दीपक भाऊ गोंदकर तसेच लुटे परिवाराच्या पुढाकाराने व बेंगळुरू येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात जनरल मेडिसिन, शस्त्रक्रिया, अस्थिरोग, स्त्रीरोग व वंध्यत्व, फिजिओथेरपी यासह विविध वैद्यकीय विभागांमध्ये रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या वेळी कन्सल्टंट न्यूरो सर्जन डॉ. हर्ष सुरेश, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. हेमलता, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सतीश, कम्युनिटी मेडिसिन तज्ज्ञ डॉ. फणींद्र यांच्यासह अन्य तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. आवश्यकतेनुसार पुढील उपचार, तपासण्या आणि औषधोपचाराबाबतही डॉक्टरांनी सल्ला दिला.
शिबिरासाठी आलेल्या अनेक रुग्णांनी आपले जुने वैद्यकीय अहवाल व कागदपत्रे सोबत आणली होती. त्या अहवालांचा अभ्यास करून डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांची दिशा स्पष्ट केली. काही गरजू रुग्णांना आवश्यक औषधेही मोफत उपलब्ध करून देण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतल्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले.यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, संग्राम कोते, सचिन लुटे, बाबासाहेब कोते, सुधाकर शिंदे, गोपीनाथ गोंदकर, बाळासाहेब लुटे, विठ्ठल मंदिराचे सुनील गोंदकर, दिगंबर कोते, दत्ता लुटे, आप्पासाहेब कोते, अमृत गायके, नगरसेवक अरविंद कोते, नितीन उत्तम कोते, रवींद्र गोंदकर, निलेश कोते, नितीन परजी कोते, किरण कोते, सुधीर शिंदे, वसंत गोंदकर, अमित शेळके, बापूसाहेब ठाकरे, किरण बोराडे,राजेंद्र बर्डे, अलकाताई गोंदकर, मंगेश ओस्तवाल, वाल्मीक गोंदकर, निलेश शिंदे, किशोर गोंदकर, अभिजित गोंदकर यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AI mural inspired by Banksy sparks backlash in Bristol: Artists spot wrong landmarks and...

Representational image(Istock) At first glance, the huge mural on the side of a Bristol pub looks like a colourful celebration of the city....

अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय-जामखेडच्या डॉ मिसबाह शेख यांचा ऐतिहासिक बहुमान

*अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय - जामखेडच्या डॉ. मिसबाह शेख यांचा ऐतिहासिक बहुमान* *जामखेड | शिर्डी आवाज न्यूज नेटवर्क* ग्रामीण भागातून येऊन मोठं स्वप्न पाहणं...

11 tehsils reel, activists seek crop inspections

A Solapur farmer walks through his through his dry sugar cane field Pune: Farmers and activists in Solapur have urged the administration to...

Sreeshankar, Solomon reach long jump final as Tejaswin slips to third in decathlon

India's Murali Sreeshankar (PTI Photo) Nagoya: Murali Sreeshankar and David Patturaj Solomon advanced to the men's long jump final at the ongoing Asian...

Taiwan says US understands defence needs as $14 billion arms package remains on hold

Taiwan's deputy foreign minister, Chen Ming-chi, emphasized that the United States is well aware of Taiwan's defense needs (Reuters) After the US China...

error: Content is protected !!