Homeआरोग्यअहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय-जामखेडच्या डॉ मिसबाह शेख यांचा ऐतिहासिक बहुमान

अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय-जामखेडच्या डॉ मिसबाह शेख यांचा ऐतिहासिक बहुमान

*अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय – जामखेडच्या डॉ. मिसबाह शेख यांचा ऐतिहासिक बहुमान*

*जामखेड | शिर्डी आवाज न्यूज नेटवर्क*

ग्रामीण भागातून येऊन मोठं स्वप्न पाहणं आणि ते सत्यात उतरवणं सोपं नसतं, पण जामखेडच्या कन्या *डॉ. मिसबाह फारूक शेख* यांनी हे करून दाखवलं आहे. नेत्रविकारांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या मानल्या जाणाऱ्या *ग्लुकोमा (काचबिंदू)* शस्त्रक्रियेत विशेष प्राविण्य मिळवत त्या *अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या महिला ग्लुकोमा सर्जन* बनल्या आहेत. त्यांच्या या नेत्रदीपक यशाची दखल घेत न्यायव्यवस्थेतील मान्यवरांनी त्यांचा गौरव केला आहे.

*न्यायाधीशांच्या हस्ते सन्मान*
जिल्हा व सत्र न्यायाधीश *मा. सत्यवान डोके* यांनी नुकतेच डॉ. मिसबाह शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला. वैद्यकीय क्षेत्रात ग्रामीण भागातील मुलींसाठी त्या आदर्श ठरल्या असल्याचे गौरवोद्गार यावेळी न्यायाधीश डोके यांनी काढले.

हा छोटेखानी सत्कार समारंभ जामखेड येथे अत्यंत आपुलकीच्या वातावरणात पार पडला. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ माजी प्राचार्य *श्रीकांत होशिंग*, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष *नासीर पठाण*, उपमुख्याध्यापक *अनिल देडे*, सामाजिक कार्यकर्ते *सुदाम वराट*, डॉ. *फारूक आझम*, *बिल्कीस शेख* आदी मान्यवर उपस्थित होते.

*यशाचं श्रेय आई-वडिलांना आणि जामखेडला*
सत्काराला उत्तर देताना डॉ. मिसबाह शेख भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, “माझ्या या यशामागे माझ्या आई-वडिलांचे संस्कार, माझ्या गुरुजनांचे मार्गदर्शन आणि जामखेडच्या मातीने दिलेली जिद्द आहे. मला आवर्जून सांगायचे आहे की खेड्यातील मुलींनी घाबरू नये, वैद्यकीय क्षेत्रात खूप संधी आहेत. आपण समाजासाठी काहीतरी करावे ही भावना ठेवा.”

डॉ. मिसबाह यांच्या या कर्तृत्वामुळे संपूर्ण जामखेड तालुक्यात अभिमानाची लाट पसरली असून सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रद्धा आणि सबुरी चा संदेश जगाला देणाऱ्या साईनगरीत रुग्णसेवेची परंपरा आज ही अखंडपणे सुरू,मोफत...

शिर्डी (प्रतिनिधी) : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगाला देणाऱ्या साईनगरीत रुग्णसेवेची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. याच सेवाभावी परंपरेला पुढे नेत कनकुरी रोडलगत श्री...

AI mural inspired by Banksy sparks backlash in Bristol: Artists spot wrong landmarks and...

Representational image(Istock) At first glance, the huge mural on the side of a Bristol pub looks like a colourful celebration of the city....

11 tehsils reel, activists seek crop inspections

A Solapur farmer walks through his through his dry sugar cane field Pune: Farmers and activists in Solapur have urged the administration to...

Sreeshankar, Solomon reach long jump final as Tejaswin slips to third in decathlon

India's Murali Sreeshankar (PTI Photo) Nagoya: Murali Sreeshankar and David Patturaj Solomon advanced to the men's long jump final at the ongoing Asian...

Taiwan says US understands defence needs as $14 billion arms package remains on hold

Taiwan's deputy foreign minister, Chen Ming-chi, emphasized that the United States is well aware of Taiwan's defense needs (Reuters) After the US China...

error: Content is protected !!