*खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय, गोगलगाव ची राहाता तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयाची हॅट्रिक…*
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचलनालय आयोजित राहाता तालुका पंचायत समिती व श्री. साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूल यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय तालुकास्तर व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २१ ते २३ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी येथे पार पडल्या.
या स्पर्धेत राहाता तालुक्यातून १४,१७,१९ वयोगट मुलांचे ६४ तर मुलींच्या ४५ संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय, गोगलगाव च्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने राहाता संघ, सिल्व्हर ओक संघ व अंतिम सामन्यात प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल चा सरळ दोन सेट मध्ये पराभव केला व सलग तीन वर्ष विजयाची परंपरा अखंडित ठेवली.
सदर संघातून कर्णधार आसावरी खाडे, आदिती देवकर, अस्मिता माघाडे, अयोध्या मगर, तनुजा खाडे, श्रुती चौधरी, मनस्वी सातकर, स्वीकृती पडवळ, आरोही मगर, श्रद्धा कांदळकर, जयश्री सातपुते, ऋतुजा खाडे यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी राहाता तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तसेच १४ वर्षाखालील मुलांचा संघाने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला या संघातून प्रथमेश मगर, साईदिप मगर, रोहन आरणे, अमित माघाडे, सुयोग त्रिभुवन, अनिकेत माघाडे, ऋषिकेश पवार यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. तसेच १७ वर्षाखालील मुलांचा संघाने तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवत अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले.
सदर संघांना क्रीडा शिक्षक श्री. सुनिल चोळके सर व प्रतिक गायकवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या ह्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मा.जि.प.अध्यक्षा मा.ना.सौ. शालिनीताई विखे पाटील, मा.खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.सुष्मिताताई विखे पाटील, शिक्षण संचालिका मा. सौ.लिलावती सरोदे मॅडम, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष मा. रामभाऊ पा. गुळवे, प.डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. रामप्रसाद मगर, सरपंच गोगलगाव ग्रामपंचायत श्री. भाऊसाहेब खाडे, वि.का.स.सो. गोगलगाव चे चेअरमन मा. निवृत्ती पा. चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पारखे सर, सौ.दळे मॅडम, कदम मॅडम, गायकवाड मॅडम, कांबळे मॅडम, मगर मॅडम, कडनर मॅडम आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





















