Homeताज्या बातम्या*राहाता तालुक्याचे भाग्यविधाते मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष...

*राहाता तालुक्याचे भाग्यविधाते मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांच्या संकल्पनेतून भव्य नामदार मॅरेथॉन २०२६ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न..*

राहाता प्रतिनिधी
राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांच्या संकल्पनेतून राहाता शहरात प्रथमच मॅरेथॉन राहाता २०२६ ही भव्य स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत 2 हजार 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला नाशिक जिल्ह्यातील स्पर्धकांनी सर्वाधिक बक्षिसे पटकावली तर 4 वर्षाचा चिमुकला व 73 वर्षाच्या आजीबाईंनी धावताना स्पर्धकां बरोबरच सर्व राहाता शहरवासीयांचे लक्ष या स्पर्धेत वेधून घेतले रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली

ही मॅरेथॉन स्पर्धा दहा पाच व तीन किलोमीटर अंतरात तीन गटांमध्ये संपन्न झाली प्रथम बक्षीस 11 हजार रुपये द्वितीय 5 हजार व तृतीय 3 हजार अशी बक्षिस देण्यात आली प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या संकल्पनेतून व नगरसेवकांच्या नियोजना द्वारे संपन्न झालेल्या या राहाता 2026 मॅरेथॉन स्पर्धेने जिल्ह्यसह पर जिल्ह्याचेही लक्ष वेधून घेतले स्पर्धेसाठी ऑनलाइन व ऑफलाईन नोंदणी पद्धत अवलंबली गेली त्यामध्ये ऑनलाईन द्वारे 1651 तर ऑफलाइन द्वारे ३७८ स्पर्धकांनी नोंदणी केली होती नाशिक धुळे संभाजीनगर जालना या जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले पाथर्डी श्रीरामपूर नगर शहर येथील स्पर्धकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला यामध्ये 1313 पुरुष तर 338 महिला मॅरेथॉन पटू सहभागी झाल्या होत्या स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकाला एक दिवस अगोदर मोफत टी-शर्ट चे वाटप केले होते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय मार्फत राबविण्यात येणाऱ्या फिट इंडिया मिशन चा ब्रँड अँबेसिडर स्वप्नाली जांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एरोबिक्स झुंबा आणि विविध व्यायामाच्या प्रकारांचे सादरीकरण करून राहते करांचे मन जिंकली.

राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जन्मदिनी 15 जून रोजी सकाळी साडेपाच वाजता वीरभद्र महाराज मंदिर प्रांगण येथून नगर मनमाड महामार्गावर घेण्यात आली शिर्डीचे उफविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी ध्वज फडकाविले नंतर स्पर्धेस प्रारंभ झाला यावेळी उपनगराध्यक्ष डॉ विजय सदाफळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश येसेकर, साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे, स्त्री रोग तज्ञ डॉ संतोष मैड, राहाता नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.
रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली दहा किलोमीटर अंतरात प्रथम कमलाकर देशमुख द्वितीय रोहित बिन्नर व तृतीय क्रमांकावर विशाल बनसोडे या स्पर्धकांनी बाजी मारली पाच किलोमीटर अंतरात प्रथम वैभव शिंदे द्वितीय अनिल जाधव व तृतीय क्रमांकावर ईश्वर झिरवळ यांनी बाजी मारली तीन किलोमीटर अंतरात प्रथम कृष्णा बोराडे द्वितीय राजवीर केला व तृतीय क्रमांकावर साईराज मुरादे खडकेवाके याने बाजी मारली तीन किलोमीटर अंतरात मुलींमध्ये प्रथम साक्षी करपे द्वितीय अंजली पंडित व तृतीय खुश हासे याप्रमाणे महिला स्पर्धकांनी बाजी मारली आहे सर्वाधिक बक्षिसे नाशिक जिल्ह्याने पटकावली आहेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेत सहभाग नोंदविल्याबद्दल विजेत्यांसह सर्वच सहभागी स्पर्धकांचे सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी अभिनंदन केले येणारा काळ हा युवकांचा व खेळाडूंचा आहे तंदुरुस्त शरीर ठेवणे खूप गरजेचे आहे महिलांनी सुद्धा खेळामध्ये सहभाग नोंदवावा त्यासाठी सराव करावा निरोगी शरीरासाठी खेळाला प्राधान्य द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, राहाता नगर परिषदेचे सर्व नगरसेवक सुकाणू समिती सदस्य आणि विखे पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपणा सर्वांचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे ठरविले आणि त्यातून या मॅरेथॉन स्पर्धेची संकल्पना उदयास आली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप वृक्षारोपण रुग्णांना फळे वाटप यासह विविध उपक्रमांनी आपण हा वाढदिवस सर्वांनी मिळून जल्लोषात साजरा केला व त्यास शहरातील नागरिकांनी पूर्णपणे साथ दिली हा क्षण खूप मोठा आनंदाचा आहे मॅरेथॉन स्पर्धेसाठी राहाता शहरातील गुड मॉर्निंग ग्रुप साईयोग फाउंडेशन सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप, लायन्स क्लब, अधिराज फिटनेस जिम अंकल इलेव्हन क्रिकेट टीम माऊली उद्योग समूह आणि विविध सामाजिक संघटनांनी ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम केले तसेच राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला मॅरेथॉन मार्गावर तसेच कार्यक्रम स्थळी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि डॉ मैड हॉस्पिटलने फिजिओथेरपीची व्यवस्था केल्याबद्दल या सर्वांचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष डॉ विजय सदाफळ,माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ नगरसेवक प्रवीण सदाफळ, अजय आग्रे, राहुल सदाफळ, माजी नगरसेवक भीमा निकाळे, दशरथ तुपे, मुन्ना शहा, संदीप मुर्तडक, ॲड मयूर पाळंदे, नितीन गाडेकर, प्रवीण रुणवाल अक्षय बोठे, नगरसेविका पूजा गिधाड, रविना माळी, पुष्पा आरणे, अर्चना निकाळे, सविता सदाफळ, मंगल डांगे, अंजली सदाफळ, अनिता शेळके, शीतल बनकर, नीता गाडेकर, राहाता मर्चंट पतसंस्थेचे राजेंद्र वाबळे, पंचकृष्णा डेअरिचे सुनीलभाऊ सदाफळ,पत्रकार राजुभाई पठाण,डॉ किरण गोरे,डॉ दत्ता कानडे,डॉ सौ स्वाती कानडे,डॉ सौ निर्मला गाडेकर,डॉ बाप्पूसाहेब पानगव्हाने ,डॉ गोकूळ शिंदे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एल-निनो पार्श्वभूमीवर राहाता शहराचा पाणीपुरवठा 3 दिवसाआड 1 तास; 19 जून 2026 पासून बदल*

*एल-निनो पार्श्वभूमीवर राहाता शहराचा पाणीपुरवठा 3 दिवसाआड 1 तास; 19 जून 2026 पासून बदल* *राहाता, दि. 1 मे*: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व...

एंजेल शॉट म्हणजे काय? महिला बारमध्ये मदत मागण्यासाठी गुप्त कोड वापरतात

तुम्ही बारमध्ये ऑर्डर कराल असे वाटते, परंतु एंजेल शॉट हे पेय नाही. हे एक शांत सुरक्षा सिग्नल आहे जे काही बार आणि...

इंधन पंपावर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाला हिंसक वळण, तिघांना अटक

रविवारी रात्री पिंपळे निलख येथील पेट्रोल पंपावर हा तरुण पेट्रोल भरण्यासाठी गेला असता किरकोळ कारणावरून आरोपीसोबत वाद झाला. पुणे: पिंपळे निलख येथील इंधन...

ईशान किशनने लखनौमध्ये ग्लेन मॅक्सवेलचे 2023 चे प्रसिद्ध वानखेडे शतक ग्रहण केले, 71 चेंडूत...

इशान किशन, ग्लेन मॅक्सवेल इशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध आतापर्यंत झळकावलेल्या सर्वात जलद शतकांपैकी एक, लखनौमध्ये बुधवारी झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय...

मा. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल गायकवाड यांच्या कडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य...

मा. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल गायकवाड यांच्या कडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अहिल्यानगर : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा....

error: Content is protected !!