*मा.ना.राधाकृष्ण विखेपाटील यांचे वाढदिवसानिमित्त आधार नोंदणी व दुरुस्ती तसेच आदित्य बिरला आरोग्य विमा शिबीर संपन्न.*
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखेपाटील यांचे वाढदिवसाचे निमित्ताने शनिवार दि.१३ जून २०२६ व सोमवार दि.१५ जून २०२६ रोजी नांदुर्खी बु. ता.राहाता जि.अहिल्यानगर येथे लोकनियुक्त सरपंच मा.श्री माधवराव चौधरी सर व सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप वाकचौरे यांचे संकल्पनेतून व आर्थिक सहभागातून नांदुर्खी बु. ग्रामस्थांसाठी आधार नोंदणी व दुरुस्ती तसेच आदित्य बिरला आरोग्य विमा शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
लोकनियुक्त सरपंच माधवराव चौधरी सर एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत.शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झाल्यापासून नांदुर्खी बु. गावात ते नेहमी अनेक सामाजिक उपक्रम राबवितात.जिल्हा परिषद शाळेतील गरीब होतकरू मुलांना आवश्यक मोफत शैक्षणिक साहित्य वाटप,पावसाळी छत्रीचे वाटप,शेतकरी ग्रामस्थांसाठी केशर आंबा वृक्षाचे वाटप,भारतीय टपाल विभागाचा ग्रामस्थांसाठी आरोग्य विमा काढणे,त्यांचे टपालात खाते सुरु करणे यांसारखे सामाजिक उपक्रम सरपंच पदावर येण्यापूर्वी गावात राबविले आहेत.लोकनियुक्त सरपंच झाल्यावर देखील सामाजिक उपक्रमांपासून ते दूर गेलेले नाहीत. शासनाने दिलेले उपक्रम पार पाडत असतांना स्वतः चे सामाजिक उपक्रम देखील राजकारण बाजूला सारून ते मोठ्या उत्साहाने राबवत असतात.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री,राहाता तालुक्याचे भाग्यविधाते मा.ना.राधाकृष्ण विखेपाटील तसेच डॉ.सुजयदादा विखेपाटील यांचे नांदुर्खी बु.गावावर विशेष असे प्रेम आहे.त्यांनी नांदुर्खी बु येथील सांस्कृतिक भवनासाठी साधारण २.५० कोटी निधी,गावातील करडोबा नगर,ज्ञानेश्वर नगर,गुरूस्थान नगर गटार योजनेसाठी १.७५ लाख निधी,दलित वस्ती सुधार योजनेसाठी ८५ लाख,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरणासाठी १५ लाख तसेच गावातील अनुषंगिक विकास कामासाठी भरीव असा निधी मंजूर केलेला आहे.साहेबांचे व दादांचे नांदुर्खी बु गावासाठीचे योगदान तसेच एक सामाजिक बांधिलकी म्हणून साहेबांचे वाढदिवसाचे औचित्य साधून असाच एक सामाजिक कार्यक्रम शनिवार दि.१३ जून २०२६ व सोमवार दि.१५ जून २०२६ रोजी लोकनियुक्त सरपंच मा.श्री माधवराव चौधरी सर व सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप वाकचौरे यांचे वतीने पार पाडण्यात आला. नांदुर्खी बु. ग्रामस्थांसाठी मोफत आधार नोंदणी व दुरुस्ती शिबीर तसेच भारतीय टपाल विभागाचा साधारण १० लाख रुपयापर्यंतचा लाभ असलेला आदित्य बिरला आरोग्य विमा शिबीर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.साधारण २५० ते ३०० ग्रामस्थांनी या शिबिराचा प्रत्यक्ष लाभ घेतला.यासाठीचा आर्थिक भार आयोजकांनी स्वतः केला.
या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्ती चे अध्यक्ष श्री सोन्याबापू चौधरी,माजी सरपंच राजेंद्र चौधरी,तसेच लोकनियुक्त सरपंच माधवराव चौधरी सर,ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब दाभाडे,श्री संदीप वाकचौरे ,माजी सरपंच बापूराव दाभाडे वि.वि.कार्य.सोसा.चे संचालक श्री संजय वाकचौरे,सामाजिक कार्यकर्ते श्री संजय चौधरी,माजी उपसरपंच श्री विरेश चौधरी,माजी उपसरपंच श्री किरण चौधरी,सामाजिक कार्यकर्ते श्री नामदेवराव चौधरी,माजी उपसरपंच श्री सचिन कोळगे,शिर्डी आय टी आय कॉलेजचे माजी प्राचार्य श्री रामनाथ चौधरी सर साईबाबा संस्थान माजी मंदिर प्रमुख श्री रमेश चौधरी तसेच नांदुर्खी बु ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच शिर्डी टपाल विभागाचे प्रमुख श्री हडवळे साहेब,श्री नालकर साहेब व त्यांचे सहकारी तसेच श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक–बधिर विद्यालय शिर्डी चे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कासार व त्यांचे सहकारी यांनी उपस्थित राहुन शिबिरार्थींना सहकार्य केले.





















