*शिर्डी आवाज न्यूज – EXCLUSIVE*
*शिर्डीत पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या वाढदिवसाला जनसागर; प्रामाणिक सेवेचे नागरिकांनी केले कौतुक*

*शिर्डी (दि.११) -* साईनगरी शिर्डीत काल एक वेगळाच सोहळा पाहायला मिळाला. पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी पोलीस ठाण्यात जनतेचा अक्षरशः महापूर लोटला होता. पोलीस ठाण्याचा इतिहासात असा वाढदिवस पहिल्यांदाच साजरा झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
सहसा पोलीस ठाण्यात तक्रारी घेऊन येणारे नागरिक, आज मात्र हातात पुष्पगुच्छ, शाल आणि केक घेऊन शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागली होती. कार्यालयात बुके ठेवायला जागा उरली नव्हती.
*नक्की काय आहे यामागचं कारण?*
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र. रोज हजारो भाविक. अशा ठिकाणी कायदा-सुव्यवस्था सांभाळणं सोपं नाही. या काळात गलांडे साहेबांनी आपल्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली. तक्रारदाराला नीट ऐकून घेणं, गरीबाला मदत करणं आणि गुन्हेगारावर जरब बसवणं – या त्रिसूत्रीमुळे ते लोकांच्या मनात बसले.
“साहेब गणवेशात असले तरी माणुसकी जपतात” अशी भावना अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.
*शिर्डी आवाज न्यूज परिवाराकडून शुभेच्छा*
या निमित्ताने शिर्डी आवाज न्यूज परिवारानेही त्यांचा सत्कार केला. त्यांच्या हातून अशीच साईंच्या नगरीत निस्वार्थ सेवा घडो, हीच प्रार्थना.


















