*शारदा शैक्षणिक संकुलात रक्षाबंधन उत्सव साजरा*
(राहाता प्रतिनिधी)रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता येथे भाऊ-बहिणींचे अतुट नाते असलेला रक्षाबंधनाचा सण विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कन्या शाखेच्यामुली व इंग्लिश मीडियम च्या छोट्या मुलींनी शारदा शैक्षणिक संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. भाऊ व बहीण यांच्यातील प्रेमाचे नाते वृद्धिंगत व्हावे, बहिणींना सांभाळण्याची जबाबदारी भावांनी स्वीकारली पाहिजे ही भावना वाढीस लागावी म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला .
याप्रसंगी संकुलाचे प्राचार्य अनिल बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाऊ बहिणीचे नाते हे निस्वार्थ नाते आहे.बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी, त्याचप्रमाणे आपण भारतीय संस्कृती जपली पाहिजे .त्यासाठी हा उत्सव आपण शाळेमध्ये साजरा केला हे सांगितले .
संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .आपल्या मनोगतातून त्यांनी आजची सामाजिक परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. भाऊ बहिणीचे नाते आपण जपले पाहिजे शाळेतील सर्व मुले व मुली एकमेकांची भाऊ-बहीण आहेत ही भावना आपण ठेवली पाहिजे . आपण या सणांच्या माध्यमातून साजरे करून भाऊ ,बहिणी च्या प्रेमामध्ये असलेली आपुलकी वाढीस लागावी यासाठी या कार्यक्रम आयोजन केले असे सांगितले . संकुलातील महिला भगिनींनी सर्व शिक्षकांना राख्या बांधल्या .
टीचर्स फाउंडेशन सातारा यांच्यामार्फत दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राचार्य अनिल बनसोडे व पर्यवेक्षिका संसारे यांना मिळाला. त्यानिमित्त संकुलाचे अध्यक्ष व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा बुके व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपप्राचार्य अशोक बोरसे ,प्राचार्या निशा चेंगोट,प्रा.शरद गमे, नितीन खेतमाळीस, विवेक गाडेकर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण दिसून आले .



















