*शारदा शैक्षणिक संकुलात ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न*-
(राहाता वार्ताहर )रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता या ठिकाणी 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थी व भारत वासियांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी राहाता शहरातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कामाविषयी आठवणी जागृत केल्या .यावेळी संकुलातील एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. संकुलातील ध्वजवंदन झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वीरभद्र मंदिरा समोरील ध्वजवंदनासाठी उपस्थित राहिले. त्यांनी राष्ट्रभक्तीपर घोषणा देऊन संपूर्ण राहाता परिसर दणाणून टाकला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलाचे प्राचार्य अनिल बनसोडे, मुख्याध्यापिका सौ गुंजाळ, एज्युटॉपच्या प्राचार्यांनी निशा चेंगोट यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. रमेश आहेर यांनी तंबाखू मुक्त भारत ,त्याचप्रमाणे संकुलातील सोनाली थोरात यांनी बाल विवाह विरोधी शपथ विद्यार्थ्यांना दिली .प्रसंगी डॉ पी. जी. गुंजाळ,साहेबराव निधाने,नानासाहेब मते ,सर्जेराव मते, सौ अर्चना शिंदे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य अशोक बोरसे सुपरवायझर शीला संसारे, पर्यवेक्षक देशमुख, प्रा. शरद गमे, प्रा. बाळासाहेब दिघे ,प्रा. रणजीत पाटील ,श्रीमती सिंधू तनपूरे पर्वत उरहे, विवेक गाडेकर ,राजकुमार साळवे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राहाता पंचक्रोशीतील पालक उपस्थित होते .यावेळी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण दिसून आले.




















