
शारदा कन्या विद्यालयातील मुलींनी घेतला शिकविण्याचा अनुभव
आज दिनांक : ५ सप्टेंबर २०२६ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शारदा कन्या विद्यामंदिर, राहाता, अहिल्यानगर येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी शिक्षिका श्रावणी बनकर व इशा बोठे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरगुडे सायली हिने विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या नामोल्लेखासह केले.यानंतर विद्यार्थिनींच्या मनोगताचा कार्यक्रम झाला. स्नेहा, स्नेहल, अद्विका, राजलक्ष्मी व श्रावणी यांनी शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांप्रती असलेला आदर व कृतज्ञता व्यक्त केली.शिक्षक मनोगतामध्ये श्री. चंदने सर यांनी विद्यार्थिनींना उद्बोधनपर मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करून शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करण्याचे आवाहन केले.सांस्कृतिक विभागाच्या वतीने श्री. उऱ्हे पर्वत, श्रीमती सातव, श्रीमती पठाण व श्रीमती बोरसे यांनी गुणवंत विद्यार्थिनी शिक्षिकांची निवड केली. मुख्याध्यापिका झालेल्या विद्यार्थिनी शिक्षिका कुमारी राधिका गायकवाड हिने आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री. साळवे आर . व्ही.यांनी आपल्या मार्गदर्शनातून “सुसंस्कृत व संस्कार देण्याचे माहेरघर म्हणजे शाळा आणि शिक्षक” हा विचार विद्यार्थिनींसमोर मांडला. त्यांनी विद्यार्थिनींना शिस्त, संस्कार, प्रामाणिकपणा व जबाबदारी यांचे महत्त्व पटवून दिले.

या कार्यक्रमास संकुलाचे मार्गदर्शक आदरणीय रमेश शिंदे पाटील यांनी विद्यार्थिनींना गुरुचे महत्व सांगितले. शिक्षकाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. शिक्षक पुढील पिढी घडवण्याचा आदर्श कार्य करत असतात असे मार्गदर्शन केले. किशोर जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.




















