शारदा कन्या विद्यामंदिर, राहता
राखी मेकिंग स्पर्धा व सीमेवरील सैनिकांसाठी राखी-शुभेच्छा संदेश उपक्रम (२०२६)
शारदा शैक्षणिक संकुल, राहता येथील ‘शारदा कन्या विद्यामंदिर’ मध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधून ‘राखी मेकिंग स्पर्धा २०२६’ आणि ‘भारतीय जवानांसाठी राखी व शुभेच्छा संदेश’ हा अत्यंत नाविन्यपूर्ण व देशप्रेम जागृत करणारा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयातील सांस्कृतिक विभाग मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने अत्यंत आकर्षक, पर्यावरणपूरक आणि कलात्मक राख्या तयार केल्या. तसेच, सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे भावूक व प्रेरणादायी शुभेच्छा संदेशही तयार केले.
या उपक्रमाला शारदा शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक आदरणीय रमेशभाऊ शिंदे पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संकुलाच्या प्राचार्या श्रीमती संसारे मॅडम, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. साळवे सर आणि पर्यवेक्षक देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे चोख नियोजन करण्यात आले होते. राखी मेकिंगसाठी ज्येष्ठ कला शिक्षक श्री. लव्हारकर सर, इंग्रजी विषय तज्ज्ञ श्री. जाधव के. एस. सर यांच्यातर्फे उत्कृष्ट राख्या बनवणाऱ्या विद्यार्थिनींना बक्षीसे दिलेआणि सर्व वर्गशिक्षकांचे विद्यार्थिनींना विशेष सहकार्य लाभले. सांस्कृतिक मंडळ प्रमुख श्री. उऱ्हे पी. आर. व त्यांच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाचे यशस्वी व्यवस्थापन केले.
स्पर्धेत तयार करण्यात आलेल्या राख्यांचे परीक्षण सौ. सातव मॅडम आणि विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांनी केले. विद्यार्थिनींच्या कल्पकतेचे सर्व शिक्षकांनी कौतुक केले. या स्पर्धेतून जमा झालेल्या सर्व राख्या आणि शुभेच्छा संदेश एका बंद लिफाफ्यात सुरक्षितपणे पॅक करून, सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय सैनिकांपर्यंत पोहोचवण्याची विशेष व्यवस्था श्री. जाधव के. एस. सर यांनी केली.
विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थिनींनी मानवी साखळीद्वारे शिस्तबद्ध व विहंगम ‘राखी’ची प्रतिकृती तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली. मुलींनी तयार केलेल्या तर्फे वृक्षांना बांधण्यात आल्या. मुख्याध्यापक व एज्युटॉपच्या प्रिन्सिपल निशा चेंगोट, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापनातील सर्व मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.





















