
विशेष बातमी: जामखेडचे ‘डॉक्टर कुटुंब’
॰जामखेडचा अभिमान महाराष्ट्राची शान ॰
अल हरम हॉस्पिटल जामखेड, डॉ. फारुख-बिलकीस रुग्ण तपासताना, डॉ. मिसबाह स्लिट लॅम्पवर, आयान कॉलेजमध्ये
एकाच छताखाली चार डॉक्टर
“जामखेडचे अल हरम हॉस्पिटल. इथे डॉ. फारुख आझम आणि डॉ. बिलकीस फारुख आझम गेली अनेक वर्ष General Practice च्या माध्यमातून हजारो गोर-गरिब रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांच्यासाठी डॉक्टरकी म्हणजे समाजसेवा.”
“आणि आता त्यांच्या पुढच्या पिढीने संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.”
डॉ. मिसबाह फारुख शेख MBBS, MS (Ophthalmology), FAEH (Glaucoma) | काचबिंदू Specialist]
“कन्या डॉ. मिसबाह फारुख शेख. बारावीनंतर अकरा वर्ष अहोरात्र अभ्यास, आई-वडिलांचे सहकार्य आणि स्वतःची जिद्द. आणि आज डॉ. मिसबाह बनल्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या काचबिंदू म्हणजेच Glaucoma Specialist.”
“काचबिंदू… डोळ्यांचा तो मुक आजार जो हळूहळू दृष्टी हिरावून घेतो. या आजाराच्या तज्ञ डॉक्टर आपल्या जिल्ह्यात नव्हत्या. आता आहेत.”
“विशेष म्हणजे, डिग्री मिळण्याआधीच अहिल्यानगर शहरातील प्रसिद्ध आनंद ऋषी हॉस्पिटलने डॉ. मिसबाह यांना आपल्याकडे सेवा देण्यासाठी आमंत्रित केले.”
सेवेचा वारसा पुढे चालवताना
“आणि ही सेवा-परंपरा इथेच थांबत नाही.”
“मुलगा आयान फारुख शेख. NEET 2024 मध्ये 615 गुण मिळवून, आज आयान विळद घाट येथील विखे पाटील मेडिकल कॉलेज म्हणजेच DVVPF MCH मध्ये MBBS च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.”
“म्हणजे आई-वडील दोघेही General Practice मध्ये. मुलगी सुपर-स्पेशालिस्ट Glaucoma Surgeon. मुलगा MBBS चं शिक्षण घेतोय.”
डॉ. मिसबाह: “आई-बाबांनी General Practice करताना आम्हाला शिकवले की रुग्णसेवाच खरी ईश्वरसेवा आहे. मी आनंद ऋषी हॉस्पिटलबरोबरच आमच्या जामखेडच्या अल हरम हॉस्पिटलमध्येही काचबिंदूच्या गरजू रुग्णांसाठी उपलब्ध असेन.”

“डॉ. फारुख आणि डॉ. बिलकीस आझम यांनी सेवेचे जे रोपटे लावले, त्याचा आता वटवृक्ष झालाय.”
“जामखेडच्या या डॉक्टर कुटुंबाला शिर्डी आवाज न्यूज चा सलाम.”श्री राजुभाई पठाण संपादक पत्रकार .






















