Homeताज्या बातम्यारोहित कापसेची पहिल्याच प्रयत्नात फूड अँड ड्रग्ज इन्स्पेक्टरपदी झेप.

रोहित कापसेची पहिल्याच प्रयत्नात फूड अँड ड्रग्ज इन्स्पेक्टरपदी झेप.

रोहित कापसेची पहिल्याच प्रयत्नात फूड अँड ड्रग्ज इन्स्पेक्टरपदी झेप.

राहाता :
जिद्द, चिकाटी आणि ध्येयपूर्तीसाठीची अथक मेहनत यांची सांगड घातली तर यश दूर राहत नाही, याचे प्रेरणादायी उदाहरण पिंपळस येथील रोहित कापसे याने घालून दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून घेण्यात आलेल्या फूड अँड ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षेत १३३ गुण मिळवत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याबद्दल राहाता नगरपालिकेत नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ आणि नगरसेवकांच्या हस्ते त्याचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी रोहितच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, रोहितने आपल्या वडिलांच्या नावासोबतच पिंपळस गाव आणि राहाता तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. त्याने दाखवलेली जिद्द आणि चिकाटी आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचा आदर्श घेऊन इतर युवकांनीही स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी रोहितच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या.

सत्काराला उत्तर देताना रोहित कापसे याने व्यक्त केलेल्या भावना उपस्थितांच्या मनाला भिडणाऱ्या ठरल्या. माझ्या वडिलांची कॉलर टाईट व्हावी, त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसावा, यासाठीच मी हा ध्यास घेतला होता, असे सांगताना त्याच्या आवाजात समाधान आणि कृतज्ञता स्पष्टपणे जाणवत होती.

रोहितकडे एम. फार्मची पदवी होती. घरची आर्थिक परिस्थिती सुदृढ होती. मोठी द्राक्षबाग आणि हॉटेल व्यवसाय असल्याने नोकरीची कोणतीही अडचण नव्हती. कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे चांगल्या नोकरीच्या संधी त्याच्यासमोर उभ्या होत्या. मात्र, त्याने त्या संधी नाकारत स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. सुरुवातीला हा निर्णय कुटुंबासाठी धक्कादायक ठरला. परंतु रोहितने आपल्या ध्येयावर विश्वास ठेवला आणि संपूर्ण एक वर्ष स्वतःला अभ्यासासाठी वाहून घेतले. घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत दिवस-रात्र अभ्यास करत त्याने स्वतःला एमपीएससीच्या तयारीत झोकून दिले. जेवणासाठीच तो खाली येत असे. मित्रमंडळी, फिरणे, मनोरंजन यापासून दूर राहत त्याच्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य होते फूड अँड ड्रग्ज इन्स्पेक्टर बनून वडिलांचा अभिमान वाढवणे. आणि अखेर त्याच्या अथक परिश्रमांना यशाची सुवर्णकिनार लाभली.

यावेळी राहाता प्रेस क्लबच्या वतीनेही रोहितचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच त्याचे वडील व भाजपचे नेते नितीनराव कापसे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रोहितच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, ध्येय स्पष्ट असेल आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची जोड असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. रोहितची यशोगाथा आजच्या युवकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरेल.

यावेळी नायब तहसीलदार हेमंत पाटील, गटनेते मुन्नाभाई शहा, नगरसेवक दशरथ तुपे, प्रवीण रुणवाल, राहुल सदाफळ, प्रवीण सदाफळ, संदीप मुर्तडक, अजय आग्रे, संदीप डांगे, भाजपचे सुनील लोंढे, अरुण मोकळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यशासाठी परिस्थिती नव्हे, तर ध्येयासाठी पेटलेली जिद्द महत्त्वाची असते, हे रोहित कापसेच्या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

One month after Moshi tragedy, PCMC’s waste management struggles to recover

New landfill within Moshi depot where dumping is happeningWaste accumulated at housing societies due to delayed collectionVehicle carrying waste stuck in landfil at...

Australia pacer takes 8/25 as Bangladesh bowled out for 54, lose match by an...

Bangladesh were bowled out for just 54 in their second innings to lose their three-day tour match against a Cricket Australia XI...

US rejects China’s Scarborough Reef measures, backs Philippines in South China Sea dispute

The United States alleged that China was using environmental and legal justifications to advance broader maritime claims across the South China Sea. The...

Jorge Messi: The man who made Messi: 5 unforgettable parenting lessons every Indian parent...

Today, August 8, 2026, the football world is mourning. Lionel Messi's father and longtime agent, Jorge Messi, died at the age of...

After online share fraud, ex-Army man fights frozen accounts battle

Proceeds from mule accounts can land even cybercrime victims in problem Pune: Any proceeds from mule accounts can land cyber fraud victims in...

error: Content is protected !!