
*राहात्यात मैड स्पेशियालिटी हॉस्पिटलमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; पीआय दिपक सरोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण*
*राहाता:*
राहाता येथील प्रसिद्ध *मैड स्पेशियालिटी हॉस्पिटल* येथे *80 वा स्वातंत्र्य दिन* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राहाता पोलीस स्टेशनचे कर्तव्यनिष्ठ *पोलीस निरीक्षक श्री. दिपक सरोदे* यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत गायन करून तिरंग्याला मानवंदना दिली.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पीआय दिपक सरोदे यांनी सर्व डॉक्टर्स, मैड हॉस्पिटलचा स्टाफ व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले. अतिशय उत्तम प्रकारे स्वातंत्र्य दिनाचे नियोजन केल्याचे सांगत, “तुम्ही अशाच प्रकारे हा उत्सव साजरा करत राहावे आणि तुमच्याकडून रुग्णांची सेवा अशीच घडत राहो” अशी अपेक्षा व्यक्त केली.
*डॉ. संतोष मैड* यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन मैड हॉस्पिटलचे कैलास बोरहाडे* यांनी केले व आभार मानले.

यावेळी डॉ स्नेहल कोठारी,डॉ प्रवीण राठोड,डॉ अशोक पाठक,पत्रकार राजुभाई पठाण,सुधाकर पाटील,संदेश गायकवाड,शुभम पवार,तैमूर इनामदार,मंदार कुलकर्णी,ऐश्वर्या कुलकर्णी,कांचन कदम,संजय कारले,अभिजीत जगताप,राहुल सोनवणे,अश्विन पन्हाळे,राहुल ताकवले,ईश्वर गोडगे,नदीम सय्यद,हर्षदा पाळंदे,राणी पाटील,आदिल सय्यद,सीमा बनसोडे,सविता पारखे,साजिद शहा,मंगेश पवार इतर मान्यवरांसह हॉस्पिटलचा स्टाफ,रुग्णांचे नातेवाईक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















