योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहस्थळी स्वच्छता अभियान…..
साईयोग फाउंडेशन चा अविरत उपक्रम…
सालाबाद प्रमाणे राहाता येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे साईयोग फाउंडेशन द्वारे योगीराज सदगुरू श्री गंगागिरी महाराज १७९ वा सप्ताह धनगरवाडी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.शिर्डी येथील साईबाबा शताब्दी वर्षात झालेल्या योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहस्थळी १५ दिवस साईयोग फाऊंडेशने स्वच्छता अभियान राबवून सेवा दिली होती.त्यानंतर प्रत्येक सप्ताहस्थळी रविवारी ही सेवा चालू ठेवली आहे.
रविवारी भल्या पहाटे राहाता येथून प्रस्थान करत सप्ताहस्थळी पोहचून साईयोग फाउंडेशनच्या ४० सदस्यांनी मुख्य सभामंडप परिसरात स्वच्छता अभियान राबविले. प्लास्टिकच्या बाटल्या,खराब पादत्राणे,चहाचे कप,पत्रावळ्या, शिळे अन्न आदी कचरा उचलून परिसर झाडून साफ केला.महिला सदस्या व बालगोपालांचा सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. स्वच्छतेची सेवा केल्यानंतर फुगडी खेळत भजन गात भक्तीसागरात आनंद घेतला.साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य श्री दिपक गाडेकर व श्री परमेश चव्हाण यांचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला. जेष्ठ सदस्य गणेश गाढवे पाटील यांनी स्वादिष्ट नाश्ता दिला.

या स्वच्छता अभियानात साईयोग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे, नगरसेवक दशरथ तुपे, योगगुरू सुरेश भिंगारदिवे, माजी नगरसेविका अनुराधा तुपे, सुष्मिता चव्हाण, किरण धस, निलिमा चेणुके, ॲड गोरखनाथ दंडवते, ॲड दिगंबर धनवटे, गणेश गाढवे, विलास वाळेकर, मोहन तांबे, बाळासाहेब गाडेकर, बबलू फटांगरे, व्यंकटेश अहिरे, संजय बाबर, संदीप डांगे, मनोज पिपाडा, सीताराम बावके, अनिल सातव, रंगनाथ सदाफळ, सुभाष दंडवते, नारायण गाडेकर, मेजर संदीप जेजुरकर, पांडुरंग गायकवाड, विठ्ठल निर्मळ, उमेश लुटे, परमेश चव्हाण, शिवाजी पोटे, दिपक गाडेकर, भास्कर बावके, केतन कुंभकर्ण, देविदास नागरे, न्यानेश्वर आरणे, कैलास चेणुके, अशोक वाणी, संजय आहेर, अर्जुन चव्हाण, सार्थक तुपे, श्राव्य चोळके आदी मान्यवर उपस्थित होते.




















