*पुणतांबासाठी पूर्णवेळ तलाठी द्या, बेकायदा वाळू उपसा थांबवा – मनसेचा तहसीलदारांना इशारा*
*राहाता | 05 ऑक्टोबर 2026:*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहाता तालुकाध्यक्ष गणेश अशोक जाधव पा. यांनी आज तहसीलदार राहाता यांना निवेदन दिले आहे.
*निवेदनातील मुख्य मागण्या:*
पुणतांबा गावासाठी पूर्ण वेळ तलाठी नेमावा. महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केला असून शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास पूर्ण वेळ तलाठी नसल्याने पंचनामा उशीर होतोय, त्यामुळे शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहू शकतो. तीन गावे असल्याने तलाठी कुठे आहे हे ग्रामस्थांना कळत नाही.

तसेच गावात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू तस्करी व मुरूम माती उत्खनन जोरात चालू आहे. तलाठ्यांना बायोमेट्रिक नसल्याने ते नेमके दुसऱ्या गावाला आहे की कुठे फिरतात हे कळत नाही, याचाच फायदा घेऊन वाळू माफिया सक्रिय झाले आहेत.
*मनसेने इशारा दिला आहे की येत्या 8 दिवसात कायमस्वरूपी तलाठी नेमला नाही व बेकायदा गौण उत्खनन थांबवले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.*
निवेदनावर विकी बेंद्रे व गणेश जाधव यांच्या सह्या आहेत.




















