
2003 साली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी निळवंडे कालव्याची दुष्काळी परिषद आयोजित केली होती. त्या कार्यक्रमाला काही नेत्यांचा विरोध असतानाही सकाळी 8.30 वाजताच अजितदादांनी येवुन डॉ.राजेंद्र पिपाडा यांना दिलेला शब्द पाळला व दुष्काळी परिषद व प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांच्या कार्यकाळातील राहाता न.पा.चे विविध विकासकामांचे उद्घाटन मा.अजितदादा यांनी केले होते.

अत्यंत दिलखुलास,परखड,प्रशासनावर पकड असलेले व स्वच्छता व निटनेटकेपणा तसेच कुठल्याही कामाचे उद्घाटन करताना ते काम योग्य झाले की नाही याचे निरिक्षण करुन कुठलीही त्रुटी असेल तर ते स्पष्टपणे मांडायचे. अजितदादा यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली. दादांना भावपुर्ण श्रद्धांजली.
(डॉ.राजेंद्र पिपाडा)




















