Homeताज्या बातम्याथोर स्वातंत्र सेनानी कै.का.ल.शिंदे पाटलांनी अनेक नागरिक घड़विले—खासदार भास्करराव भगरे

थोर स्वातंत्र सेनानी कै.का.ल.शिंदे पाटलांनी अनेक नागरिक घड़विले—खासदार भास्करराव भगरे

*थोर स्वातंत्र्य सेनानी कै.का.ल. शिंदे पाटलांनी अनेक नागरिक घडविले-* *खासदार भास्करराव भगरे*
(राहाता वार्ताहर) रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता या ठिकाणी थोर स्वातंत्र्य सेनानी का.ल. शिंदे पाटील स्मृतिदिन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी मतदार संघाचे खासदार भास्करराव भगरे उपस्थित होते. या प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरीब जनतेला शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली व का.ल. शिंदे यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी जोडले त्याचेच एक उदाहरण म्हणजे शारदा शैक्षणिक संकुल आहे. शिंदे पाटलांचे शिक्षण सातवी पर्यंत झालेली होते त्यांना नोकरी देखील मिळाली असती परंतु त्यांना इंग्रजांची गुलामगिरी त्यांना मान्य नव्हती त्यांनी ह्या संकुलाची पायाभरणी करून आज 78 वर्षांमध्ये एवढी मोठी शिक्षणाची सोय या परिसराला करून दिली हे मोठे काम आहे. शिंदे पाटलांची अपेक्षा रमेशजींनी पूर्ण केली काळाची गरज ओळखून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली हे मोठे काम आहे .शिंदे पाटील हे शिक्षक नव्हते परंतु त्यांनी अनेक शिक्षक या ठिकाणी घडविले .कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्याचा त्यांनी उल्लेख करत असताना अण्णा अनवाणी पायांनी फिरले व त्यांनी रयत शिक्षण संस्था संस्थेचा विस्तार केला असे मनोगतात सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मकांत कुदळे जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा हे होते .त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था आहे व या रयत शिक्षण संस्थेतील शारदा शैक्षणिक संकुल हे एक नावाजलेले संकुल आहे. का.ल. शिंदे पाटलांनी या संकुलासाठी स्वतःला वाहून घेतले ते आमचे आदर्श आहेत या संकुलाचे बरेचसे विद्यार्थी मोठ्या पदावर आहेत शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजा झालेले आहेत. रयत शिक्षण संस्थेने कारकून नको संशोधक तयार करायला हवे असे आपल्या मनोगत सांगितले.
माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांनी भाऊ बरोबर असलेले त्यांचे अनुभव व्यतीत केले .भाऊंनी गाव पातळीवर शाळा सुरू करून गोरगरीब जनतेला शिक्षण देण्याची काम केले .समाजसेवा केली. नेहमी आईच्या आज्ञेचे पालन करायचे. संस्काराची शिदोरी त्यांनी आपल्या आईकडून घेतली होती .कमी बोलून मोठे काम त्यांनी केले ते एक न्यायालय होते त्यांचा आदर्श लोकघेत होते उत्तम नागरिक घडविण्याचे काम त्यांनी या परिसरामध्ये केले असे सांगितले जनरल बॉडीचे सदस्य अरुण चंद्रे यांनी आपल्या मनोगतातून तीन वर्ष शिक्षक पदावर या संकुलात काम मी केले व भाऊंबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली याचे मी भाग्य समजतो का.ल .शिंदे पाटील हे शिक्षकांचे आधारस्तंभ होते शाळेच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे लक्ष होते चांगल्याला चांगले व शाबासकीची थाप देऊन ते प्रत्येक शिक्षकाकडून चांगले काम करून घेत होते शारदा संकुलाची एवढी मोठी विद्यार्थी संख्या याचे श्रेय भाऊंना जाते वडिलांचा वारसा घेऊन रमेश शिंदे जे काम करत आहे त्यांच्या कामाचे कौतुक त्यांनी केले याप्रसंगी उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात शारदा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून का.ल .शिंदे पाटलांचे विचार जिवंत आहेत शारदा संकुलाचा इतिहास ,पायाचा दगड म्हणून भाऊंनी काम केले त्यांचे स्मरण करणे अतिशय गरजेचे आहे रयतेचा पायाच कार्यकर्ते आहे का.ल. शिंदे पाटलांच्या धर्म पत्नीचे ऋण त्यांनी व्यक्त केले त्यांच्यामुळेच भाऊ एवढे मोठे काम करू शकले असे सांगितले
भाऊंची कन्या मंगलाताई पाटील यांनी अनुभव व आठवणी खूप आहेत व त्यातून आम्ही घडलो अशी सांगितले भाऊंच्या मनात स्वाभिमान ठासून भरलेला होता ते कधीही कुणापुढे झुकले नाही आजचे युग स्वार्थासाठी सर्व काही करते परंतु भाऊंनी स्वार्थ बघितला नाही भाऊ सारखे वडील आम्हाला लाभले ही आमचे भाग्य समजतो समाजाच्या विकासासाठी संकुलाची स्थापना केली इंग्रजांची नोकरी नाकारली आजींनी त्यांच्यावर खूप संस्कार केले भाऊंच्या आठवणी सांगताना त्यांनी भाऊंचे बँकेत लॉकर होते मृत्यूनंतर लॉकर उघडल्यानंतर त्यामध्ये एक फाईल सापडली त्या फाईल मध्ये जेल ची सजा झाल्याचे सर्टिफिकेट त्यांनी जपून ठेवले एवढे राष्ट्रप्रेम त्यांच्या मनात होते ही सांगितली वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थीनिस व आर .बी .एन .बी. कॉलेज या महाविद्यालयास फिरता करंडक देण्यात आला आदर्श शिक्षिका पुरस्कार अंजली बारवे यांना देण्यात आला गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य अनिल बनसोडे यांनी केले याप्रसंगी राजेंद्र वाबळे साहेबराव गाडेकर नानासाहेब नळे सर्जेराव मते,भगवानराव टिळेकर, मनोज कवडे, कुणाल बनकर, गोरक्षनाथ बनकर ,सुरेश वाबळे, प्रा. शरद गमे ,प्रा.बाळासाहेब दिघे, प्रा. पंकज दिघे, प्रा. सिंधू तनपुरे उपप्राचार्य अशोक बोरसे , मुख्याध्यापिका हेमलता गुंजाळ प्राचार्य निशा चेंगोट, राजकुमार साळवे,विवेक गाडेकर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश आहेर व सोनाली थोरात यांनी केले आभार प्रदर्शन संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Ganesh immersion processions on Friday: Key roads shut, traffic diversions across city; heavy vehicles...

Pune: Police have announced sweeping traffic restrictions and diversions across the city for the Ganesh immersion procession on Friday, with seven major...

‘Aur achha ho sakta tha’: Mairaj Ahmad Khan after Indian skeet team’s record medal...

Mairaj Ahmad Khan (Image credit: Agencies) NEW DELHI: Indian skeet shooter Mairaj Ahmad Khan believes India's historic run of three medals in skeet...

Delhi’s park, street, shop: Nowhere felt safe for these girls

Delhi recorded 13,396 crimes against women, including 1,058 rape cases, in 2024. In a span of 14 days, four cases involving minor girls...

5 purple snakes that look too surreal to be real

Snakes are scary, venomous slithers that are mostly found in Green, brown, and black colours, and purple isn't a colour most people associate with...

All-party meet must discuss flagged SIR discrepancies: Supriya

Pune: NCP (SP) working president Supriya Sule on Wednesday demanded an all-party meeting to discuss the alleged discrepancies in the SIR exercise.Supriya...

error: Content is protected !!