Homeताज्या बातम्याआदिवासी बांधवांसाठी शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची सोडत निघाल्यास साईबाबांच्या दर्शनासाठी लोणी ते...

आदिवासी बांधवांसाठी शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची सोडत निघाल्यास साईबाबांच्या दर्शनासाठी लोणी ते शिर्डी पायी चालत येणार –डॉ सुजय विखे पाटील.

शिर्डी (प्रतिनिधी)- आगामी

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपरिषदेसाठी अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी बांधवासाठी नगराध्यक्षपदाची सोडत निघावी याकरिता आपण साईबाबांना साकडे घातले असून, साईबाबांनी याप्रमाणे इच्छापूर्ती केल्यास साईबाबांच्या समाधीचे दर्शनासाठी लोणी ते शिर्डी पायी चालत येणार असल्याचे सुतोवाच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

मंगळवारी सायंकाळी शिर्डीतील एका कार्यकमाच्या प्रसंगी डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सहकारी संस्था म्हटली की गट, तट, नाराजी, मतभेद आणि विरोध असतोच. अनेक तांत्रिक अडचणी असतात. कधी त्या पदासंदर्भात असतात तर कधी मानापानासाठी असतात. याचा अनुभव आम्हाला आहे. मात्र, साईबाबांच्या कृपेने ना. राधाकृष्ण विखे पाटील व विखे पाटील परिवारावर सर्वांचाच विश्वास आहे. गटबाजी असली तरी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य विखे पाटील परिवाराकडे आहे. आगामी अडीच महिन्यावर येऊन ठेपलेल्या नगरपरिषदेच्या

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यक्ती नगराध्यक्ष पदाचे दावेदार समजतात. आमचे भाग्य आहे की आमच्याकडे प्रत्येक नेता नगराध्यक्ष पदाच्या ताकदीचा आहे. असा मिश्किल टोला लावत शिर्डी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाची सोडत ही अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी समाज बांधवांसाठी निघावी अशी प्रार्थना आपण साईबाबांकडे केली असून साईबाबांना तसे साकडे घातले आहे. साईबाबांनी ही इच्छा पूर्ण केल्यास मी स्वतः लोणी ते शिर्डी पायी चालत साई दर्शनासाठी येणार आहे. त्यावेळी सर्व पदाधिकारी आणि नागरिक या निर्णयाचे स्वागत करतील, असा मला विश्वास आहे. सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी बांधवांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली पाहिजे. त्यांच्या हातून सुद्धा विकास साध्य करता आला पाहिजे, याकरिता ही माझी भूमिका आहे.

शिर्डीचा विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. मात्र आपल्या महिला, मुली, भगिनी सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच शिर्डीचा योग्य पद्धतीने विकास साध्य करण्याकरिता आपण योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे. विरोधक पॅनल उभे करतील, त्यास हरकत नाही. मात्र डॉ. एकनाथ गोंदकर असो किंवा विरोधी पक्षातील इतर मान्यवर, त्यांनी शिर्डीच्या विकासाला कधीही विरोध केला नाही अथवा आडकाठी निर्माण केली नाही, ही बाब कौतुकास्पद आहे. सुरक्षित व गुन्हेगारी मुक्त शिर्डी निर्माण करणे हे माझं ध्येय व उद्दिष्ट असून याकरिता मला आपणा सर्वांची साथ लागणार आहे. कुठल्याही वाईट प्रवृत्तीला छोट्याशा आर्थिक स्वार्थासाठी स्थान देऊ नका.

आर्थिक फायद्यासाठी अपप्रवृत्तींना डोक्यावर बसवून घेऊ नका. शिर्डीचे स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी विखे पाटील परिवार कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी शिर्डीत गुन्हेगारी व अवैध धंदे रोखण्यासाठी चांगल्या प्रकारची कामगिरी करत असल्याचे सांगत पोलिसांचे त्यांनी कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोबेल पारितोषिक विजेते चिलीचे कवी पाब्लो नेरुदा यांचे आजचे कोट: “आपण ज्यांच्यावर प्रेम करतो...

पाब्लो नेरुदा (प्रतिमा: विकिपीडिया) काही अवतरण कल्पना स्पष्ट करतात. इतर लोक फक्त एका भावनेचे वर्णन करतात जे बहुतेक लोकांनी कधीतरी अनुभवले आहे परंतु...

विरोधाला न जुमानता पीएमसी स्थायी समितीने निवडक नागरी शाळा खाजगी संस्थेद्वारे चालविण्यास मान्यता दिली...

16 जून रोजी पीएमसी स्थायी समितीची बैठक झाली पुणे : भाजपच्या नेतृत्वाखालील पीएमसी स्थायी समितीने मंगळवारी इतर राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानता निवडक...

फ्रान्स वि सेनेगल, FIFA विश्वचषक 2026 लाइव्ह स्कोअर: Kylian Mbappé आणि Sadio Mané 24...

फ्रान्सने FIFA विश्वचषक 2026 मधील सेनेगल विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी एक मजबूत आणि आक्रमक प्रारंभिक इलेव्हन नाव दिले आहे, अंतिम तिसर्यामध्ये वेग, सर्जनशीलता आणि तांत्रिक...

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ अपघाती स्फोटात जेसीओ, 3 सैनिक जखमी. भारत...

प्रतिनिधी प्रतिमा (IANS) जम्मू: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना झालेल्या अपघाती भूसुरुंगाच्या स्फोटात एक कनिष्ठ आयुक्त अधिकारी...

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

error: Content is protected !!